Shruti Vilas Kadam
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच चर्चेत असते.
सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोइंग असून ती सतत सक्रिय असते.
तिचा ‘सखे गं साजणी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात तिच्यासोबत प्रार्थना बेहरे आणि अभिजीत खांडेकर झळकले.
आता तिचा ‘सालबर्डी’ हा नवा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.
‘सालबर्डी’मध्ये पूजा सावंत पोलीस अधिकाऱ्याच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे.
हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी हे दमदार कलाकार यात सहभागी आहेत.