Kiran Mane Post: ‘छे... नाही यार अक्ष्या... डोळे भरून येताहेत...’ किरण मानेची ‘फ्रेंडशिप डे’ निमित्त खास मित्रासाठी भावुक पोस्ट

Kiran Mane's Friendship Day Post: टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता किरण माने कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाकरिता चर्चेत असतो.
Kiran Mane's Special Post For Actor Akshay Pendse
Kiran Mane's Special Post For Actor Akshay PendseFacebook
Published On: 

Kiran Mane's Special Post For Actor Akshay Pendse: टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता किरण माने कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाकरिता चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनमध्ये आपल्या दमदार खेळीने, उत्तम रणनीतीतून किरण मानेने टॉप ३ मध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले होते. नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहणारा किरण माने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतंच किरणने त्याचा मित्र आणि अभिनेता अक्षय पेंडसेसाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

Kiran Mane's Special Post For Actor Akshay Pendse
Kedar Shinde Post : सवंगडी आपलं जीवन समृद्ध करतात... फ्रेंडशिप डेनिमित्त केदार शिंदेंनी शेअर खास फोटो

मालिकेसह, नाटकातून आणि चित्रपटातून किरणने आपल्या अभिनयाचा ठसा इंडस्ट्रीत उमटवला. नुकतेच किरण मानेने मित्र अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. दोघांचेही २३ डिसेंबर २०१२ रोजी कार अपघातात निधन झाले होते. आनंद आणि अक्षय दोघेही एका चित्रपटाचं शुटींग आवरून मुंबईला जात होते. घरी परतत असताना, पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रत्युष यांचे निधन झाले. किरण मानेने नुकताच अक्षयसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. ती पोस्ट फ्रेंडशिप डे निमित्त चर्चेत आली आहे. (Marathi Actors)

किरण माने पोस्टमध्ये म्हणतो, “आमच्या नाटकाचा दर पंधरा दिवसांनी पुण्याला दौरा असायचा... पहाटे- पहाटे माटुंग्याहून बस निघायची. रात्री नीट झोप झालेली नसायची. बसमध्ये बसल्या-बसल्या आम्ही पांघरूण घेऊन गाढ झोपून जायचो. मात्र मेगा हायवे सुरू झाला की, अक्ष्या पेंडसे उठून खिडकीतून बाहेर दर्‍या- डोंगर- जंगल बघत बसायचा कायम. मी त्याला म्हणायचो, “झोप की भावा.” तो म्हणायचा,“मला सकाळ- सकाळी हा भवतालचा सगळा परिसर पहायला खूप आवडतो. खूप फ्रेश होतो मी हे पाहून.” प्रचंड आकर्षण होतं त्याला मेगा हायवेचं!” (Entertainment News)

Kiran Mane's Special Post For Actor Akshay Pendse
Seema Haidar And Sachin Meena Love Story: पाकिस्तानातून भारतात आली अन् सोशल मीडियावर स्टार झाली; सीमा-सचिनच्या लव्ह स्टोरीची भन्नाट चर्चा

“त्याला माहितही नसेल की नंतर कधीतरी याच हायवेवर.... 'त्या' भिषण अपघाताला आता बरीच वर्ष झाली. त्यानंतर असंख्यवेळा मी सातारहून मुंबईला गेलो. गाडी उर्से टोलनाक्यावर गेलीय आणि अक्ष्याची आठवण झाली नाही असं एकदाही झालं नाही. तिथे गेल्यावर मी कायम पुटपुटतो, “काय यार अक्ष्या... हे बरोबर नाय झालं. हे वय होतं का भावा असं सोडून जायचं !” दोन दिवसांपूर्वी मी 'श्री तशी सौ' नाटकाची आठवण टाकली आणि कमेन्टमध्ये अनेकांनी अक्षय पेंडसेची आठवण काढली. खूप अस्वस्थ झालो. अक्ष्या कायम म्हणायचा, “किरण, तू जरा जास्तच इमोशनल आहेस. हे ठिक नाही. त्रास तुलाच होतो.”

“काय करू अक्ष्या, अजूनही मला तो माझा स्वभाव मला बदलता आला नाही. कमेंटस वाचल्यानंतर आपल्या मैत्रीचे- सहवासाचे अनेक क्षण आठवत बसलोय. मन उदास झालंय. आठवणींचं मळभ दाटून आलंय. तुला खूप मिस करतोय यार. अक्षयची आणि माझी आधी ओळख होती. पण खरी घट्ट मैत्री झाली ती या नाटकाच्या निमित्तानं! नाटकाचे तुफान प्रयोग व्हायचे. सारखे दौरे. महाराष्ट्रभरच नाही, तर जगभर. दौर्‍यात आम्ही रुम पार्टनर. मग रात्री उशीरापर्यंत गप्पा- टप्पा, खवय्येगिरी, भटकंती. एकमेकांची सुख दु:खं शेअर करणं. सगळं आलंच! दोघेही स्ट्रगलच्या समान टप्प्यावर. पण जेलसी, ईर्षा, स्पर्धा असे प्रकार आम्हा दोघांत कधीच झाले नाहीत. फक्त आणि फक्त धमाल !”

Kiran Mane's Special Post For Actor Akshay Pendse
Bipasha Basu On Daughter : बिपाशा बासूच्या लेकीची लहान वयात मोठ्या आजाराशी झुंज; ६ तासांची ओपन हार्ट सर्जरी, अभिनेत्रीला अश्रू अनावर

“स्कॉटलंडला ॲबरडिनच्या नाईट क्लबमध्ये मी गोर्‍या पोरींबरोबर डान्स फ्लोअरवर धुमाकूळ घालत असताना लांबून गालातल्या गालात हसत माझ्याकडे पहात डोळे मिचकावणारा अक्ष्या मी कधीच विसरु शकत नाही. 'ग्लेनफिडीज' स्कॉच फॅक्टरीला दिलेली भेट. डफटाऊन-एडींबरा सगळीकडे फिरताना, बाहेर बर्फ पडायला लागला की अक्ष्या त्याच्या आवडीची हळूवार इंग्लीश गाणी ऐकायचा. एक दिवस वैतागून मी आणि अक्षता बिवलकरने 'जवा नविन पोपट हा' , 'आबा जरा सरकून बसा की नीट' पासून 'ढगाला लागली कळ' अशी लावलेली इरसाल गाणी... त्यावर वैतागलेला अक्ष्या...हे आठवून अजूनही हसू येतं.”

Kiran Mane's Special Post For Actor Akshay Pendse
Kushal Badrike Post : ‘त्या माझ्या मित्रांना….’ कुशल बद्रिकेची ‘फ्रेंडशिप डे’निमित्त मित्रांसाठी स्पेशल पोस्ट

“तो अतिशय शिस्तप्रिय, मी बेशिस्त, तो टापटिपीत रहाणारा, मी धसमुसळा. अति सभ्यपणावरून मी त्याची जाम खेचायचो! पण तो चिडायचा नाही. एकदम जेंटलमन, कष्टाळू, सुसंस्कृत... टोकाचा मातृभक्त! आईचा प्रचंड प्रभाव त्याच्यावर. 'ग्रेट कूक' !! त्याच्या हातचे खूप पदार्थ आवडीनं खाल्लेत मी. आम्हा दोघांच्याही मुलांचा जन्म आठ- दहा दिवसांच्या अंतराने झाला. कायम आमचा एकमेकांना फोन...मी फोन करायचो, 'अरे आरूष आज स्वत:हून पालथा होऊ लागला.' तो सांगायचा 'प्रत्युषही ट्राय करतोय...”

Kiran Mane's Special Post For Actor Akshay Pendse
Jar Tar Chi Goshta Housefull Show: ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ, पहिल्याच प्रयोगाला झळकली ‘हाऊसफुल्ल’ची पाटी

“आमच्या लेकरांच्या वाढीचा एकेक दिवस आम्ही एकमेकांशी उत्सूकतेनं शेअर करायचो ! अक्षय तर मुलाची शी-शू धुणे, अंघोळ घालणे आणि मुलाचं लंगोट वगैरे धुवून वाळत घालण्यापर्यन्त सगळं-सगळं हौसेनं करायचा. मला आश्चर्य वाटायचं. मला नाही जमायचं ते. अक्ष्या गेला... जाताना प्रत्युषलाही बरोबर घेऊन गेला.. छे... नाही यार अक्ष्या... डोळे भरून येताहेत... नाही लिहू शकत मी तुझ्यावर... ही वेळ नव्हती गड्या तुझी जाण्याची अक्ष्या !”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com