Bipasha Basu On Daughter : बिपाशा बासूच्या लेकीची लहान वयात मोठ्या आजाराशी झुंज; ६ तासांची ओपन हार्ट सर्जरी, अभिनेत्रीला अश्रू अनावर

Bipasha Basu-Karan Singh Grover : देवीचा जन्म झाला तेव्हा तिला वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट (VSD) झाला होता.
Bipasha Basu with Daughter Devi
Bipasha Basu with Daughter Devi Instagram
Published On: 

Bipasha Basu Spoke About Daughter Devi's Surgery : बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर यांना 12 नोव्हेंबर, 2022 रोजी त्यांच्या मुलीला जन्म दिला. बिपाशा आणि करणने त्यांचे मुलीचे नाव देवी बासु सिंह ग्रोवर, ठेवले आहे. तिच्या नावाची घोषणा करण्यासाठी एक पोस्ट देखील त्यांनी शेअर केली होती.

परंतु देवीचा जन्म झाला तेव्हा तिला वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट (VSD) झाला होता. बिपाशाने नेहा धुपियासोबत इंस्टाग्राम लाइव्हवर नुकत्याच झालेल्या संभाषणादरम्यान हे सांगितले. बिपाशा भावूक म्हणाली की, तिच्या मुलीच्या हृदयात दोन छिद्रे आहेत आणि ती सुमारे तीन महिन्यांची असताना तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Bipasha Basu with Daughter Devi
Kushal Badrike Post : ‘त्या माझ्या मित्रांना….’ कुशल बद्रिकेची ‘फ्रेंडशिप डे’निमित्त मित्रांसाठी स्पेशल पोस्ट

बिपाशा याविषयी बोलताना म्हणाली, 'आमचा प्रवास सामान्य पालकांपेक्षा खूप वेगळा आहे, सध्या माझ्या चेहऱ्यावर जे हसू आहे ना त्याहून अधिक कठीण काळातून मी गेले आहे. हे कुठल्याच आईच्या बाबतीत होऊ नये अशी माझी इच्छा आहे. नवीन आईला जेव्हा हे कळते तेव्हा ते सर्वात कठीण असते.

माझ्या बाळाच्या जन्मानंतर तिसऱ्या दिवशी मला कळलं की आमच्या मुलीच्या हृदयाला दोन छिद्रे आहेत. मला ठरवलं होत की मी हे कधी शेअर करणार नाही, पण मी हे शेअर करत आहे कारण मला असे वाटते की यात मला मदत करणाऱ्या अनेक माता आहेत आणि त्या मातांना शोधणे खूप कठीण होते.

बिपाशा पुढे म्हणाले, 'व्हीएसडी म्हणजे काय हे आम्हाला माहीत नव्हते. वेंट्रिक्युलर सेप्टल. आम्ही त्यादरम्यान वेड्यासारखे वागत होतो. आम्ही आमच्या कुटुंबाशी याबद्दल चर्चा केली नाही, आम्ही दोघे थोडे घाबरलो होतो. करण आणि मी सुन्न झालो. पहिले पाच महिने आमच्यासाठी खूप कठीण गेले. पण देवी पहिल्या दिवसापासून हुशार आहे.

आम्हाला सांगण्यात आले की ते स्वतःच रिकव्हर होत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आम्हाला दर महिन्याला स्कॅन करणे आवश्यक आहे. पण ते छिद्र खूप मोठे होते, आम्हाला सांगण्यात आले की ते धोकादायक आहे, तुम्हाला शस्त्रक्रिया करावी लागेल. मूल तीन महिन्यांचे झाल्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल.

बिपाशा रडू लागली आणि म्हणाली, 'तुम्हाला खूप वाईट वाटतंय, खूप ओझं असल्यासारखे वाटतंय, कारण तुमच्या मुलाची ओपन हार्ट सर्जरी होणार होती. तुम्ही विचार करतो की ते आपोआप बरे होईल.

पहिल्या महिन्यात तसे झाले नाही, दुसऱ्या महिन्यात तसे झाले नाही आणि मला आठवते तिसरा महिना, जेव्हा आम्ही स्कॅनसाठी गेलो, सर्जनला भेटलो, हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरांशी बोललो तरीही मी तयार नव्हते, करण नव्हता. मला माहित होते की ती ठीक आहे आणि ती आता बरी आहे. पण माझ्या मुलीवर योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी शस्त्रक्रिया कशी करायची, ही अडचण होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com