Kedar Shinde Post : सवंगडी आपलं जीवन समृद्ध करतात... फ्रेंडशिप डेनिमित्त केदार शिंदेंनी शेअर खास फोटो

Kedar Shinde Share Photo:
Kedar Shinde Post : सवंगडी आपलं जीवन समृद्ध करतात... फ्रेंडशिप डेनिमित्त केदार शिंदेंनी शेअर खास फोटो
Published On: 

ऑगस्ट महिना म्हणजे मैत्रीचा महिना. या महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. प्रत्येकाच्या जीवनात मित्र असतात आणि ते खास असतात. जे पण घरच्यांची बोलू शकत नाही ते पण मित्रांकडे बोलतो.

आपल्या सर्वांसाठी फ्रेंडशिप डे खास असतो. तसेच तो सेलेब्रिटींसाठी देखील आहे. आज फ्रेंडशिप डेनिमित्त अनेक कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना फ्रेंडशिप दिनाच्या शुभेच्छा आहेत.

Kedar Shinde Post : सवंगडी आपलं जीवन समृद्ध करतात... फ्रेंडशिप डेनिमित्त केदार शिंदेंनी शेअर खास फोटो
Bipasha Basu On Daughter : बिपाशा बासूच्या लेकीची लहान वयात मोठ्या आजाराशी झुंज; ६ तासांची ओपन हार्ट सर्जरी, अभिनेत्रीला अश्रू अनावर

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी फ्रेंडशिप डेनिमित्त एक फोटो शेअर केला आहे. ज्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. केदार शिंदे आणि भरत जाधव, अंकुश चौधरी, अरुण कदम, संजय नार्वेकर यांची मैत्री जवळपास २०-२५ वर्ष जुनी आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत केदार शिंदे आणि एक खास फोटो शेअर करत सर्वांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

केदार शिंदे यांनी फोटो पॉट करत कॅप्शन दिले आहे की, 'काही गोष्टींची सुरूवात करताना.. आपल्यासोबत चे सवंगडी आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. माझ्या आयुष्यातील हीच ती लोकं.. कोण कोण आहेत? ओळखलत तर comments मध्ये सांगा.'

केदार शिंदेंनी शेअर केलेल्या जुन्या फोटोमध्ये अरुण कदम, भरत जाधव, अंकुश चौधरी, संतोष पवार, जयराज नायर हे मराठी कलाकार कलाकार आहेत.

केदार शिंदेप्रमाणे, कुशल बद्रिके, सोनाली कुलकर्णी, अमृता खानवलीकर, प्रार्थना बेहेरे यांनी पोस्ट केल्या हेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com