Seema Haidar And Sachin Meena Love Story: पाकिस्तानातून भारतात आली अन् सोशल मीडियावर स्टार झाली; सीमा-सचिनच्या लव्ह स्टोरीची भन्नाट चर्चा

Seema- Sachin New Song: यशराज मुखातेने त्या महिलेच्या विधानावर एक गाणं क्रिएट केलं आहे. सध्या ते गाणं सोशल मीडियावर बरंच व्हायरल होत आहे.
Seema Haidar And Sachin Meena Love Story Song
Seema Haidar And Sachin Meena Love Story SongSaam Tv
Published On: 

Seema Haidar And Sachin Meena News: PUBG गेममुळे अनेकांचे जसे संसार उद्ध्वस्त झाले, तसेच अनेकांनी संसार थाटले आहे. सध्या सर्वत्र सीमा हैदर हे नाव कमालीचं चर्चेत आहे. पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदरचं आणि भारतात राहणाऱ्या सचिन मीणासोबत PUBG गेममुळे सुत जुळलं.

आपल्या प्रेमाला भारतात भेटायला सीमा आली अन् वादाच्या कचाट्यात सापडली. सीमा सध्या भारतात तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहत आहे. सचिनच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने दोघांच्याही ‘लव्हस्टोरी’वर भाष्य केलं आहे.

त्या महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यशराज मुखातेने त्या महिलेच्या विधानावर एक गाणं क्रिएट केलं आहे. सध्या ते गाणं सोशल मीडियावर बरंच व्हायरल होत आहे.

Seema Haidar And Sachin Meena Love Story Song
Kushal Badrike Post : ‘त्या माझ्या मित्रांना….’ कुशल बद्रिकेची ‘फ्रेंडशिप डे’निमित्त मित्रांसाठी स्पेशल पोस्ट

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर दोघांच्याही लव्हस्टोरीवर अनेक मीम्स, ट्रोलिंग व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांच्या ह्या अनोख्या लव्हस्टोरीवर यशराज मुखाते या काँटेंट क्रिएटरने हे नवं गाणं बनवलं आहे.

सध्या हे नवं गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सचिनच्या शेजारच्या एक महिलेने ‘लप्पू सा सचिन, झिंगूर सा लडका’ असं म्हणत सचिन आणि सीमाच्या लव्हस्टोरीवर टीका केली होती.

त्या महिलेने ‘लप्पू सा सचिन, झिंगूर सा लडका’ म्हणलेले हे वाक्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या वाक्याचं गाणं क्रिएट करून यशराज मुखातेने गाणं तयार केलं.

यशराज मुखातेच्या नव्या गाण्याला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पसंदी दर्शवली आहे. नेटकरी यशराजच्या या नव्या गाण्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. यशराज मुखातेने बनवलेले हे नवीन गाणे ऐकून तुम्ही ही नक्कीच हसून– हसून लोटपोट व्हाल. यशराज मुखातेचे ‘लप्पू सा सचिन…’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Trolled)

Seema Haidar And Sachin Meena Love Story Song
Jar Tar Chi Goshta Housefull Show: ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ, पहिल्याच प्रयोगाला झळकली ‘हाऊसफुल्ल’ची पाटी

यशराजने आतापर्यंत अनेक वेगवेगळे गाणे क्रिएट करून नेटकऱ्यांचे मनोरंजन केले आहे. रसोडे मैं कौन था, पावरी हो रही है, साड्डा कुत्ता कुत्ता अशा अनेक गाण्यांचे क्रिएशन यशराजने केले आहे. यशराजला ‘रसोडे मैं कौन था’ या गाण्यामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.

अनेकदा त्याच्या गाण्यांची भूरळ बॉलिवूड कलाकारांनाही पडली होती. काही कलाकारांनी देखील त्याच्या गाण्यावर प्रतिक्रिया दिली होती. यशराजच्या या नव्या गाण्यालाही नेटकऱ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com