Shocking: शुटिंग सुरू असताना चित्रपटाच्या सेटवर मोठा स्फोट, एकाचा जागीच मृत्यू

Killer Movie: किलर चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान मोठी दुर्घटना घडली. शुटिंग सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले.
Shocking: शुटिंग सुरू असताना चित्रपटाच्या सेटवर मोठा स्फोट, एकाचा जागीच मृत्यू
Killer Moviesaam tv
Published On
  • चेन्नईमध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना

  • गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला

  • या दुर्घटनेत एका टेक्निशियनचा मृत्यू झाला

  • तर तीन जण गंभीर जखमी झाले

दाक्षिणात्य अभिनेता एम. जे. सूर्याच्या किलर या आगामी चित्रपटाच्या सेटवर भयंकर घटना घडली. चित्रपटाचे शुटिंग सुरू असताना मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये टेक्निशियनचा मृत्यू झाला. शुटिंगदरम्यान अचानक गॅस सिंलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये ३ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चेन्नईतील पेरांबूर येथील बिन्नी मिल्स कॉम्पलेक्समध्ये चित्रपटाचे शुटिंग सुरू होते. यावेळी बॉम्बस्फोटाच्या दृश्याचे शुटिंग करत असताना वापरण्यात येत असलेल्या एका गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये मदुरवोयल येथे राहणारे मदन (२६ वर्षे) आणि सूर्या (२३ वर्षे), कुंद्रथूर येथे राहणारा शक्तिवेल (२७) आणि नेरकुंड्रम येथे राहणारा दिनकरन (२४ वर्षे) हे चौघे गंभीर जखमी झाले.

Shocking: शुटिंग सुरू असताना चित्रपटाच्या सेटवर मोठा स्फोट, एकाचा जागीच मृत्यू
Movie On Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातवर येणार चित्रपट; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री साकारणार महत्त्वाची भूमिका, काळ्या कृत्यांचा मोठ्या पडद्यावर खुलासा

जखमींना तात्काळ राजीव गांधी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामधीले एकाचा डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत. या स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या स्फोटानंतर सेटवर एकच गोंधळ उडाला आणि शुटिंग थांबवण्यात आले.

Shocking: शुटिंग सुरू असताना चित्रपटाच्या सेटवर मोठा स्फोट, एकाचा जागीच मृत्यू
Rinku-Akash : रंगलं तुझ्यात, याडं लागलं गं...; आर्ची-परश्याची 'तीच' केमिस्ट्री, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले...

अपघाताच्या वेळी एस. जे. सूर्या सेटवर उपस्थित होता की नाही हे अस्पष्ट आहे. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अभिनेता-निर्माता सूर्याने या घटनेवर अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. मात्र या घटनेमुळे तमिळ चित्रपटसृष्टीत सेटवरील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण यापूर्वीही तमिळ चित्रपटसृष्टीत सेटवर अशा घटना घडल्या. नुकताच, रजनीकांत आणि नेल्सन दिलीपकुमार यांच्या 'जेलर २' या चित्रपटाच्या सेटवर एक मोठा अपघात घडला. पनयूर येथील एका स्टुडिओमध्ये सेट उभारणी करत असताना एकाला विजेचा धक्का लागला होता.

Shocking: शुटिंग सुरू असताना चित्रपटाच्या सेटवर मोठा स्फोट, एकाचा जागीच मृत्यू
'Deool Band 2' Movie Box Office Collection 7 Days: 'देऊळ बंद 2' चित्रपटाची गाडी सुसाट, पहिल्याच आठवड्यात कमावले तब्बल 'इतके' कोटी रूपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com