Rinku-Akash : रंगलं तुझ्यात, याडं लागलं गं...; आर्ची-परश्याची 'तीच' केमिस्ट्री, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले...

Sairat - Rinku Rajguru- Akash Thosar : 'सैराट' फेम प्रेक्षकांची आवडती जोडी आर्ची-परश्या पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांचा एक क्यूट व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Sairat - Rinku Rajguru- Akash Thosar
Rinku-Akash SAAM TV
Published On
Summary

'सैराट' चित्रपटामुळे आर्ची-परश्याची जोडी सुपरहिट झाली.

रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर प्रेक्षकांची आवडती जोडी आहे.

रिंकू आणि आकाश नुकतेच एकत्र स्पॉट झाले.

'सैराट' चित्रपटातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली आर्ची-परश्याची जोडी आजही सुपरहिट आहे. 'सैराट' नाव काढताच प्रेक्षकांना आर्ची-परश्या आठवतात. 'सैराट' या चित्रपटाला तब्बल १० वर्ष पूर्ण झाली आहेत. १० वर्षानंतरही आर्ची-परश्या म्हणजेच महाराष्ट्राची लाडकी जोडी रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांची मैत्री तशीच आहे. दोघे कायम एकमेकांना भेटत राहतात. अनेक कार्यक्रमांना एकत्र जातात. एकमेकांसाठी सुंदर सोशल मीडियावर पोस्ट करतात. अशात आता ही स्टार जोडी पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात दोघे खूपच क्यूट आणि आनंदी दिसत आहे. आर्ची-परश्या पुण्यातील एका कार्यक्रमात एकत्र स्पॉट झाले. उद्योजिका उषा काकडे यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्यासाठी दोघे एकत्र आले होते. या कार्यक्रमाला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार आले होते.

रिंकूने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. मिनिमल मेकअप, गोल्डन ज्वेलरी आणि शॉर्ट हेअरकटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. तर आकाशने व्हाईट शर्ट, जीन्स अशा कूल लूक केला होता. त्यांनी एकत्र पोज दिली. दोघांचे सुंदर क्षण कॅमेऱ्याने कैद केले. दोघेही धमालमस्ती करताना दिसले. दोघेही आता इंडस्ट्रीतील महत्त्वाचा चेहरा बनले आहेत.

रिंकू राजगुरु पोस्ट

रिंकूने आकाशसोबतचा एक क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात परश्याने मस्त आर्चीच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसत आहे. दोघांची केमिस्ट्री कमाल आहे. फोटोमध्ये दोघेही मन मोकळेपणाने हसताना दिसत आहे. रिंकूने या पोस्टला खूपच खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "आम्ही भेटलो, आम्ही हसलो, आम्ही काहीही फोटो काढले... " चाहते या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. भरभरून दोघांसाठी प्रेम व्यक्त करत आहेत.

Sairat - Rinku Rajguru- Akash Thosar
Raja Shivaji - Abhishek Bachchan : 'राजा शिवाजी' VFX वरून ट्रोल; अभिषेक बच्चननं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला- "रितेश देशमुख..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com