Shruti Vilas Kadam
रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या पोस्टमध्ये तिने लिहिले, एका चिमुकल्या पंजाने माझ्या आयुष्यात पाऊल टाकले आणि सर्व काही बदलून टाकले भेटा माझ्या बाळाला. रोमियो
‘सैराट’मधील आर्ची म्हणून प्रसिद्ध झालेल्या रिंकूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते.
नुकतीच ती पुन्हा एकदा साडे माडे तीन या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिच्या कामाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले.
रिंकू सध्या सिंगल आहे की रिलेशनशिपमध्ये, याबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत.
तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून अनेकांनी या पोस्टला क्यूट अशी कमेंट केली आहे.
रिंकूने अद्याप ती सिंगल आहे की रिलेशनशिपमध्ये या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे तिच्या रिलेशनशिपचं गूढ कायम आहे