Shruti Vilas Kadam
एका बाउलमध्ये 2 चमचे दही, 1 अंडं, 1 चमचा खोबरेल तेल आणि 1 चमचा मध मिसळा. हा मास्क केसांवर 30-40 मिनिटे लावून ठेवा, नंतर शॅम्पूने धुवा.
अंड्यामध्ये भरपूर प्रोटीन असते, जे केसांना मजबुती देऊन तुटणे कमी करते आणि नैसर्गिक केराटिनसारखा परिणाम देते.
दही आणि मध केसांना खोलवर मॉइश्चर देतात, त्यामुळे केस मऊ, चमकदार आणि सिल्की दिसतात.
खोबरेल तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचून कोरडेपणा कमी करते आणि स्कॅल्पला पोषण देते.
या सर्व घटकांतील पोषक तत्त्वे केसांच्या मुळांना बळकटी देतात, ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते.
मध आणि दही केसांतील फ्रिझ नियंत्रित करून केस अधिक स्मूथ आणि व्यवस्थित ठेवतात.
दहीतील प्रोबायोटिक्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म स्कॅल्प स्वच्छ ठेवतात आणि डँड्रफ कमी करण्यास मदत करतात.