Shruti Vilas Kadam
अॅव्होकाडोमध्ये हेल्दी फॅट्स (मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स) असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारतात.
फायबर आणि हेल्दी फॅट्समुळे पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं, त्यामुळे ओव्हरइटिंग टाळून वजन कमी करण्यास मदत होते.
अॅव्होकाडोमध्ये व्हिटॅमिन E आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे त्वचा ग्लोइंग ठेवतात आणि केस मजबूत करतात.
यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.
अॅव्होकाडोमध्ये ल्यूटिन आणि झिएक्सॅन्थिन असतात, जे डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात.
हेल्दी फॅट्समुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
अॅव्होकाडोमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन K, C, B6 यांसारखे पोषक घटक असतात, जे शरीराला आवश्यक एनर्जी आणि पोषण देतात.