Sanjay Dutt : ३३ वर्षांनंतर 'बल्लू' तुरुंगातून फरार; लांब केस अन् वाढलेले दाढी, संजय दत्तला पाहून थरकाप उडेल | VIDEO

Sanjay Dutt - Khalnayak Return : 'धुरंधर'नंतर संजय दत्त आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा थरारक टीझर आणि फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.
Sanjay Dutt - Khalnayak Return
Sanjay DuttSAAM TV
Published On
Summary

'धुरंधर' नंतर संजय दत्त पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवणार.

'खलनायक रिटर्न्स'चा फर्स्ट लूक टीझर प्रदर्शित झाला आहे.

टीझरमध्ये संजय दत्तचा थरारक अंदाज पाहायला मिळणार आहे.

'धुरंधर' स्टार संजय दत्त पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाला आहे. ३३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'खलनायक' या कल्ट क्लासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटामुळे संजय दत्तला 'खलनायक' म्हणून ओळख मिळाली. आता ३३ वर्षांनंतर, 'बल्लू' तुरुंगातून पळून धुमाकूळ घालण्यासाठी परत आला आहे. नुकताच 'खलनायक रिटर्न्स'चा फर्स्ट लूक टीझर प्रदर्शित झाला आहे. ज्यात संजय दत्त एका क्रूर आणि थरारक लूकमध्ये दिसत आहे.

'खलनायक रिटर्न्स'चा फर्स्ट लूकमध्ये एक माणूस रक्ताने माखलेला जमिनीवर पडलेला दिसतो. त्यानंतर, संजय दत्त हातकड्या घालून एक दमदार एन्ट्री घेतो. तो आपली सिगार पेटवतो आणि घोगऱ्या आवाजात म्हणतो, "मी तुम्हाला सांगितले होते... १० ऑक्टोबरला, रात्री १० वाजता, बल्लू तुरुंगातून पळून जाईल... मी हिरो नाही, मी व्हिलन आहे...."

संजय दत्तने सोशल मीडियावर 'खलनायक रिटर्न्स'चे दोन पोस्टर्स शेअर केले आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये संजय दत्त एकटक पाहत सिगार पेटवताना दिसत आहे आणि त्याच्या हातात आग लागलेली आहे. दुसऱ्या पोस्टरमधील त्याचे भयानक हास्य खरोखरच अंगावर काटा आणणारे आहे. फोटो शेअर करून संजय दत्तने हटके कॅप्शनमध्ये लिहिले, "प्रत्येक कथेची एक वेळ असते आणि तिची वेळ आली आहे....खलनायक रिटर्न्स."

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

संजय दत्तच्या 'खलनायक रिटर्न्स'चा फर्स्ट लूक पाहून चाहते चित्रपटासाठी खूपच उत्सुक दिसत आहेत. टीझरवर कौतुकाचा आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका युजरने लिहिलं की, "खलनायक रिटर्न्स धुरंधरचा बाप आहे...", दुसऱ्या युझरने लिहिले, " बॉलिवूडमध्ये संजय दत्तपेक्षा चांगला खलनायक कोणीही असू शकत नाही..." , तिसऱ्य युझरने लिहिले की, "संजू बाबा खलनायक म्हणून परत आले आहेत..." चाहते आता 'खलनायक रिटर्न्स' साठी प्रचंड उत्सुक पाहायला मिळत आहेत.

'खलनायक' चित्रपट 1993 मध्ये रिलीज झाली होता. या चित्रपटात संजय दत्तसोबत माधुरी दीक्षितने मुख्य भूमिका साकारली होती. जॅकी श्रॉफ यांचाही या चित्रपटात महत्त्वाचा वाटा होता. 'खलनायक रिटर्न्स' ची अद्याप रिलीज डेट अधिकृतपणे जाहीर झाली नाही. मात्र चित्रपट 2027 ला रिलीज होणार असल्याचे बोले जात आहे.

Sanjay Dutt - Khalnayak Return
Bigg Boss Marathi 6 Winner : "मी त्याच्याशी लग्न करणार..."; 'बिग बॉस मराठी ६' विजेती तन्वी कोलतेने वैयक्तिक आयुष्याबद्दल केला मोठा खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com