Dhurandhar Star : 'धुरंधर' हिट होताच सुपरस्टारला मिळाला नवा चित्रपट, थेट ऋषभ शेट्टीसोबत करणार स्क्रीन शेअर

Dhurandhar Fame Actor Got Big Movie : 'धुरंधर' फेम अभिनेत्याला चित्रपटाच्या यशानंतर आणखी एक मोठा चित्रपट मिळाला आहे. ज्यात अभिनेता साऊथ स्टार ऋषभ शेट्टीसोबत झळकणार आहे.
Dhurandhar Fame Actor Got Big Movie
Dhurandhar Starsaam tv
Published On
Summary

'धुरंधर 2' ला जगभरात मोठे यश मिळाले आहे.

'धुरंधर' फेम अभिनेता आता ऋषभ शेट्टीसोबत झळकणार आहे.

'धुरंधर 2' चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

सध्या सर्वत्र 'धुरंधर: द रिव्हेंज' बोलबाला पाहायला मिळत आहे. प्रेक्षक 'धुरंधर 2' मधील कलाकारांचे कौतुक करताना दिसत आहेत. अशात आता 'धुरंधर 2'च्या यशानंतर चित्रपटातील एका सुपरस्टारला मोठ्या चित्रपटाची लॉटरी लागली आहे. 'व्हरायटी इंडिया'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'कांतारा' फेम अभिनेता ऋषभ शेट्टीच्या 'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' (The Pride of Bharat: Chhatrapati Shivaji Maharaj) या चित्रपटात अर्जुन रामपालची वर्णी लागली आहे.

ऋषभ शेट्टीचा 'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' चित्रपट संदीप सिंग दिग्दर्शित आहे. मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास चित्रपटातून सांगण्यात येणार आहे. 'व्हरायटी इंडिया'च्या रिपोर्टनुसार, अर्जुन रामपाल या चित्रपटातील एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. अर्जुन रामपालची चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये एन्ट्री झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात अभिनेत्री शेफाली शाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारणार असल्याचे बोले जाते.

संदीप सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण या वर्षाच्या उत्तरार्धात सुरू होण्याची शक्यता आहे. प्रीतम यांचे संगीत आणि रवी वर्मन यांचे छायाचित्रण असणार आहे. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगण्यात येणार आहे. चाहते या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. 'धुरंधर' नंतरचा अर्जुन रामपालचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. चाहते अर्जुन रामपालच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरव आधारित आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचे नाव 'राजा शिवाजी' असे आहे. हा चित्रपट महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुखचा आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट 1 मे 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात जेनेलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, फरदीन खान, भाग्यश्री आणि सचिन खेडेकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.

Dhurandhar Fame Actor Got Big Movie
Ranveer Singh : 'धुरंधर 2'ची Success पार्टी रणवीर सिंगने गाजवली; fa9la गाण्यावर बेभान होऊन नाचला, VIDEO होताय तुफान व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com