Dhurandhar 2 : बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर २'चे वादळ; अवघ्या 48 तासांत 200 कोटींची कमाई, रणवीर सिंगचा बोलबाला

Dhurandhar The Revenge Box Office Collection Day 2 : रणवीर सिंगचा 'धुरंधर २' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने दोन दिवसांत 200 कोटींचा टप्पा पार केला.
Dhurandhar The Revenge Box Office Collection Day 2
Dhurandhar 2saam tv
Published On
Summary

'धुरंधर 2' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला.

'धुरंधर 2' ने दोन दिवसांत 200 कोटींचा टप्पा ओलांडला.

'धुरंधर 2' आदित्य धर दिग्दर्शित आहे.

सध्या सर्वत्र 'धुरंधर 2' ची हवा पाहायला मिळत आहे. 'धुरंधर 2' आदित्य धर दिग्दर्शित आहे. तसेच या चित्रपटात मुख्य भूमिकेत रणवीर सिंग झळकला आहे. 'धुरंधर 2' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'धुरंधर 2' हा एक जबरदस्त ॲक्शन चित्रपट असून यात रहमान डकैतच्या मृत्यूनंतर पुढे काय घडते, हे दाखवण्यात आले आहे. ही कथा भारताचा गुप्तहेर असलेल्या आणि पूर्वी 'जसकीरत सिंह रंगी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमझा अली माझारीच्या प्रवासाची आहे. चित्रपटाने दोन दिवसांत तब्बल 200 कोटींचा गल्ला जमावला आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'धुरंधर 2' ने दोन दिवसांत 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'धुरंधर 2' प्रदर्शनापूर्वी, निर्मात्यांनी 18 मार्च 2026 रोजी विशेष 'पेड प्रिव्ह्यू' शो आयोजित केले होते. 'धुरंधर 2' चित्रपटाने केवळ या प्रिव्ह्यू शोमधूनच 43 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाने पहिल्या दिवशी 102.55 कोटी रुपयांचा गल्ला जमावला. तर दुसऱ्या दिवशी 80.72 कोटींचा व्यवसाय केला.

'धुरंधर: द रिव्हेंज' ची भारतातील एकूण 'नेट' कमाई 226.27 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर चित्रपटाचे ग्रॉस कलेक्शन 269.39 कोटी रुपये इतकी झाली आहे. आदित्य धर यांनी केवळ एकाच भाषेत नव्हे, तर तब्बल पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित करून मोठ्या प्रेक्षकवर्गाला आकर्षित केले आहे. हिंदीत 78.94 कोटी रुपये, कन्नडमध्ये 0.03 कोटी रुपये, मल्याळममध्ये 0.01 कोटी रुपये, तमिळमध्ये 0.44 कोटी रुपये आणि तेलुगू भाषेत 1.30 कोटी रुपयांचा मोठा गल्ला जमवला आहे.

रणवीर सिंगची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

'धुरंधर 2' रणवीर सिंगचा चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. फक्त 48 तासांत 'धुरंधर 2' ने इतिहास रचला आहे. या चित्रपटाने केवळ दोन दिवसांत 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. तसेच रणवीर सिंगच्या टॉप 5 चित्रपटांमध्येही स्थान मिळवले आहे. आता रणवीर सिंगचा 'धुरंधर 2' वीकेंडला किती कमावतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

रणवीर सिंगचे टॉप 5 चित्रपट

  • धुरंधर: 894.49 कोटी रुपये

  • पद्मावत: 300.26 कोटी रुपये

  • सिम्बा: 240.22 कोटी रुपये

  • धुरंधर २: 226.27 कोटी रुपये

  • बाजीराव मस्तानी: 184 कोटी रुपये

Dhurandhar The Revenge Box Office Collection Day 2
Famous Actor Death : सिनेसृष्टीवर शोककळा, प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com