Shreya Maskar
साऊथ सुपरस्टार ऋषभ शेट्टी सध्या 'कांतारा चॅप्टर 1' मुळे चांगलाच चर्चेत आहे. 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज झाला आहे.
'कांतारा चॅप्टर 1'ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे शो हाऊसफुल पाहायला मिळत आहे. तसेच सर्वत्र ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.
'कांतारा चॅप्टर 1' चा दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता ऋषभ शेट्टी आहे. तसेच चित्रपटात ऋषभ शेट्टीसोबत रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया, जयराम हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.
नुकतीच ऋषभ शेट्टीने 'कांतारा चॅप्टर 1'च्या यशानंतर वाराणसीला भेट दिली. ऋषभ शेट्टी वाराणसीला जाऊन गंगा आरती आणि पूजेमध्ये सहभागी झाला.
ऋषभ शेट्टीने काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतले. ऋषभ शेट्टीने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पांढरी लुंगी परिधान केली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, 'कांतारा चॅप्टर 1' जगभरात 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'कांतारा चॅप्टर 1' इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलुगू, मल्याळम, तमिळ या भाषांमध्ये प्रदर्शित झाला.
मीडिया रिपोर्टनुसार, 'कांतारा चॅप्टर 1' हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. अमेझॉन प्राइम व्हिडीओने स्ट्रीमिंग अधिकार 125 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.
'कांतारा चॅप्टर 1'ची ओटीटी रिलीज डेट अद्याप जाहीर झाली नाही आहे. मात्र चित्रपट पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत ओटीटीवर येईल असे बोले जात आहे.