Honey Singh And Badshah: 'कलेच्या नावाखाली अश्लीलता चालणार नाही…'; हनी सिंग आणि बादशाहला हायकोर्टाचा कडक इशारा

Honey Singh And Badshah: दिल्ली उच्च न्यायालयाने 'माफिया मुंडीर व्हॉल्यूम १' या गाण्यावरून गायक हनी सिंग आणि बादशाह यांना फटकारले आहे. हे गाणे इतके अश्लील आणि बीभत्स आहे की तात्काळ हे गाणं काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
Honey Singh And Badshah
Honey Singh And BadshahSaam tv
Published On

Honey Singh And Badshah: प्रसिद्ध रॅपर्स यो यो हनी सिंग आणि बादशाह यांच्यातील वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे; मात्र, आता दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या एका जुन्या आणि अत्यंत वादग्रस्त गाण्याबाबत एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने गायक-रॅपर्स हनी सिंग आणि बादशाह यांना मोठा धक्का देत त्यांच्या ‘माफिया मुंडीर’ (Mafia Mundeer) व्हॉल्यूम १ या वादग्रस्त गाण्यावर कठोर कारवाई केली आहे. न्यायालयाने हे गाणे सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून तात्काळ हटवण्याचे आदेश दिले असून, त्यातील आशयाला “अत्यंत अश्लील आणि बीभत्स” असे म्हटले आहे.

न्यायमूर्ती पुरुशैंद्र कौरव यांच्या एकलपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना स्पष्ट केले की, गाण्याचे बोल महिलांचा अपमान करणारे असून कोणताही सुसंस्कृत समाज अशा प्रकारच्या गाण्याला परवानगी देऊ शकत नाही. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कलात्मक किंवा सामाजिक मूल्य मुळीच नाही. कलाविष्कार किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली केला जात असला तरीही, कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाऊ शकत नाही. अशा शब्दात न्यायालयाने फटकारले

Honey Singh And Badshah
Lalit Prabhakar: प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता महिनाभर अंथरुणाला खिळून होता, नेमकं काय झालं होतं?

न्यायालयाने हनी सिंग, बादशाह आणि या गाण्याशी संबंधित हक्क असलेल्या सर्व व्यक्तींना आदेश दिले की, गाण्याशी संबंधित सर्व URLs, व्हिडिओ आणि ऑडिओ सामग्री यूट्यूब, गूगल, स्पॉटिफायसह सर्व सोशल मीडिया आणि म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरून तात्काळ हटवावी. तसेच, रिमिक्स किंवा इतर आवृत्त्यांनाही या आदेशाचा समावेश करण्यात आला आहे.

ही याचिका हिंदू शक्ती दल या संस्थेने दाखल केली होती. यामध्ये गाण्याच्या आशयामुळे समाजावर चुकीचा परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला होता. न्यायालयाने गाणे ऐकल्यावर म्हटले की, या प्रकरणामुळे न्यायालयाचे अंतःकरण हादरून गेले आहे.

Honey Singh And Badshah
Dhurandhar 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा जलवा; 'धुरंधर २' ची १३ दिवसात १५०० कल्बमध्ये एन्ट्री

याशिवाय, न्यायालयाने दोन्ही कलाकारांना नोटिसा बजावत पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, वादग्रस्त लिंक्सची यादी तयार करून केंद्र सरकारकडे सादर करण्याची मुभा याचिकाकर्त्याला देण्यात आली आहे, जेणेकरून संबंधित प्लॅटफॉर्म्सना त्या हटवण्याचे आदेश देता येतील. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ मे रोजी होणार आहे. त्यावेळी हनी सिंग आणि बादशाहला हजर राहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com