Lalit Prabhakar: प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता महिनाभर अंथरुणाला खिळून होता, नेमकं काय झालं होतं?

Lalit Prabhakar : आजारपणामुळे महिनाभर अंथरुणावर असतानाही या प्रसिद्ध अभिनेत्याने त्याचे काम थांबवले नाही. ‘सुपर डुपर’ चित्रपटासाठी त्याने फिटनेस आणि शूटिंग दोन्ही सांभाळत उत्तम काम करुन सर्वांना थक्क केले.
Lalit Prabhakar
Lalit Prabhakar Saam Tv
Published On

Lalit Prabhakar : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर सध्या त्याच्या ‘सुपर डुपर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा ३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून चित्रपटातील त्याचा शर्टलेस सीन विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र या सीनमागे त्याने केलेली मेहनत आणि त्याचा संघर्ष ऐकून चाहत्यांनाही आश्चर्य वाटत आहे.

राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत ललित प्रभाकरने त्याच्या आजारपणाबद्दल खुलासा केला. तो म्हणाला की, शूटिंगच्या आधी तो तब्बल महिनाभर गंभीर आजारी होता आणि अक्षरशः अंथरुणाला खिळून राहिला होता. अशा परिस्थितीत अचानक शूटिंग जवळ आल्याने त्याच्यावर लवकरात लवकर बरा होण्याचे प्रेशर होते.

Lalit Prabhakar
Ramayana Teaser: आदिपुरुषने जे केलं, ते रणबीरच्या सिनेमाने धुवून काढलं; 'रामायण'चा टिझर पाहिल्यावर नेटकरी काय म्हणाले?

या चित्रपटात त्याचा शर्टलेस सीन असल्याने त्याला फिटनेसकडे विशेष लक्ष द्यावे लागले. कमी वेळात शरीर पुन्हा फिट करण्यासाठी त्याने मोठी मेहनत घेतली. त्याने सांगितले की, आजारातून सावरत असतानाच शूटिंग पूर्ण करणे आव्हानात्मक होते, पण शेवटी मला ते करण्यात यश मिळालं. विशेष म्हणजे, एवढ्या त्रासातही त्याने शूटिंगचा आनंद घेतल्याचेही त्याने सांगितले.

Lalit Prabhakar
Ramayana Teaser: हनुमान जयंतीला आला 'रामायण'चा टिझर, रणबीर कपूर बनला 'पुरुषोत्तम राम'; नेटकरी एका सुरात म्हणाले शानदार!

चित्रपटाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनीही ललितच्या मेहनतीचे कौतुक केले आहे. त्यांनी सांगितले की, ललितला त्या काळात खूप त्रास होत होता, तरीही त्याने शूटिंगसह डान्स रिहर्सलही केली. त्यामुळे त्याच्या कामाबद्दलच्या समर्पणाबद्दल आदर वाटतो आणि त्याला ‘सॉरी’ म्हणावेसे वाटते.

दरम्यान, ‘सुपर डुपर’ या चित्रपटात ललित प्रभाकरसोबत विदुला चौगुले, निर्मिती सावंत, कुशल बद्रिके आणि शशांक शेंडे यांसारखे कलाकार झळकणार आहेत. चित्रपटातील नव्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ललित प्रभाकर हा फिटनेस फ्रीक अभिनेता म्हणून ओळखला जातो. मात्र या प्रसंगातून त्याची जिद्द आणि कामावरील निष्ठा दिसून येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com