Ramayana Teaser: आदिपुरुषने जे केलं, ते रणबीरच्या सिनेमाने धुवून काढलं; 'रामायण'चा टिझर पाहिल्यावर नेटकरी काय म्हणाले?

Ramayana Teaser: रामायण चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच रणबीर कपूरचा प्रभू राम अवतार चर्चेत आहे. भव्य VFX आणि रामाची झलक पाहून नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या? जाणून घेऊयात.
Ramayana Teaser
Ramayana TeaserSaam tv
Published On

Ramayana Teaser: रणबीर कपूरच्या आगामी रामायण या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दिग्दर्शक Nitesh Tiwariआणि निर्माती नमित मल्होत्रा यांच्या या चित्रपटाच्या पहिल्याच झलकमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हिंदू महाकाव्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाची भव्यता आणि सादरीकरण प्रेक्षकांना अक्षरशः थक्क करून टाकणारे आहे.

रामायणच्या सुमारे २ मिनिटे ३८ सेकंदांच्या या टीझरमध्ये प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या वनवासापासून ते रावणाची झलक दाखवण्यात आली आहे. साई पल्लवी (सीता) आणि रवी दुबे (लक्ष्मण) यांच्यासोबत रणबीर कपूरची केमिस्ट्री विशेष लक्ष वेधून घेते. या टिझरचे प्रत्येक सीन मनाला भिडणारे असून चाहते आणि नेटकरी टिझर कसा वाटला हे सांगत आहेत.

Ramayana Teaser
Ramayana Teaser: हनुमान जयंतीला आला 'रामायण'चा टिझर, रणबीर कपूर बनला 'पुरुषोत्तम राम'; नेटकरी एका सुरात म्हणाले शानदार!

हा टीझर पाहताच, प्रेक्षकांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव केला. हा टीझर पाहिल्यानंतर, प्रेक्षकांनी लगेचच याची तुलना आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाशी करण्यास सुरुवात केली. एका नेटकऱ्याने लिहीले, 'आदिपुरुष टीझरमधील सर्वात वाईट भाग कोणता? रावणाचे वटवाघळावर स्वार होणे. पण रामायणम टीझरमधील सर्वात उत्तम भाग कोणता? तर ते 'पुष्पक विमान'.' दुसऱ्या एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली, 'टीझरमध्ये १:५० मिनिटांला प्रभू श्रीराम ज्या प्रकारे ते मागे वळून पाहतात तो सीन खरोखरच हृदयस्पर्शी आहे.' आणखी एका नेटकऱ्याने लिहीले, "मला हा टीझर पुन्हा पुन्हा पाहावासा वाटत आहेत.

Ramayana Teaser
Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा नवरा अडचणीत; मावळच्या शेतकऱ्याने खेचलं कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, आदिपुरुषने जो गोंधळ केला तसा करु नका." आणखी एकाने लिहीले, टीव्ही सिरियल सारखी VFX असल्यासारखे का वाटतयं? एका नेटकऱ्याने लिहीले, रामाचे एक्सप्रेशन कुठे आहेत पण... प्लिज या चित्रपटात माती करु नका. आणखी एकाने लिहीले, टिझर चांगला आहे पण, ट्रेलरमध्ये काय असणार हे मला बघायचं आहे. आता येत्या काळात या चित्रपटाचा ट्रेलर कसा असेल यावर प्रेक्षकांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com