Deepika Padukone Flaunt Her Jacket
Deepika Padukone Flaunt Her JacketSaam TV

Deepika Padukone Promoting Ranveer Singh's Movie : रणवीर सिंगची बायको गुणाची; नवऱ्याच्या चित्रपटाचं दीपिका करतेय भन्नाट प्रमोशन

Deepika Padukone Look : दीपिकाने रणवीर सिंगचे कस्टमाइज्ड जॅकेट कॅरी केले होते.
Published on

Deepika Padukone Watch Movie with Ranveer : आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी, 28 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. तब्बल सात वर्षांनी करण जोहर पुन्हा दिग्दर्शक म्हणून परतला आहे. करणचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

दरम्यान, अभिनेता रणवीर सिंग त्याची पत्नी दीपिका पदुकोणसह शनिवारी मुंबईतील एका पीव्हीआरला त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. यावेळी दीपिका पदुकोण एका वेगळ्या अवतारात दिसली.

Deepika Padukone Flaunt Her Jacket
Sonu Sood Birthday: खराखुरा 'हिरो नं १', महाराष्ट्रात फक्त ५ हजार घेऊन आला, नाव कमावलं; आता अख्खी मुंबई जिंकली

बॉक्स ऑफिसवर हिट ठरलं असलेल्या नवऱ्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन करताना दीपिका दिसली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.50 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाने 16 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने दोन दिवसांत एकूण 27.10 कोटींची कमाई केली आहे.

बॉलिवूडचे हे पॉवर कपल हातात हात घालून चित्रपट पाहण्यासाठी जाताना स्पॉट झाले. यावेळी दीपिका डेनिम लूकमध्ये दिसली. दीपिकाने रणवीर सिंगचे कस्टमाइज्ड जॅकेट कॅरी केले होते. दीपिकाने डेनिम जॅकेट घातले होते.

त्यावर रणवीरचा रॉकी ओर रानी चित्रपटातील लुक प्रिंट केलेला होता, तर तिच्या जॅकेटच्या पुढच्या बाजूला खिशाच्यावर RS असे चमकदार अक्षरात लिहिले होते. पापाराझींनी तिचे जॅकेट पाहिल्यावर दीपिकाने अभिमानाने ते फ्लॉंट केले आणि फोटोसाठी पोजही दिली.

दीपिकाने पांढरा टँक टॉप, हाय-वाइस्ट ब्लू डेनिम ट्राउझर्स आणि ओव्हरसाईज सनग्लासेससह तिचा लूक केला होता. तर तिथे रणवीर ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसला. त्याने काळ्या रंगाचा स्वेटशर्ट, मॅचिंग ट्राउझर्स, फेस मास्क, बीनी कॅप आणि सनग्लासेस घातले होते. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com