Sonu Sood Birthday: खराखुरा 'हिरो नं १', महाराष्ट्रात फक्त ५ हजार घेऊन आला, नाव कमावलं; आता अख्खी मुंबई जिंकली

Sonu Sood Turns 50: पिळदार शरीरयष्टी, डोळ्यांत 'अंगार', जणू रिअल लाइफमधलाच खलनायक वाटावा असा मोठ्या पडद्यावरचा सहज वावर, बॉलिवूड आणि टॉलिवूडचा स्टार सोनू सूदचा ५० वा वाढदिवस आहे.
Sonu Sood Turns 50
Sonu Sood Turns 50Instagram
Published On

Sonu sood birthday News: पिळदार शरीरयष्टी, डोळ्यांत 'अंगार', जणू रिअल लाइफमधलाच खलनायक वाटावा असा मोठ्या पडद्यावरचा सहज वावर, बॉलिवूड आणि टॉलिवूडचा स्टार सोनू सूदचा ५० वा वाढदिवस आहे. अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या सोनूनं कोरोना काळात गरीब, स्थलांतरित मजुरांसाठी केलेल्या कामामुळं लोकांच्या हृदयात कायमचं स्थान मिळवलं कळलंच नाही. कोरोना काळात मदतीला धावून जाणारा 'मसिहा' म्हणून त्याची खास ओळख निर्माण झाली. मदत मिळेल म्हणून अडले-नडलेले लोक आजही त्याच्या घराबाहेर रांगा लावताहेत. त्याच्या दारातून निराश होऊन कधीच परतणार नाही, अशी त्या बिचाऱ्यांना अपेक्षा असते आणि सोनूही ती पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो.

Sonu Sood Turns 50
Kangana Ranaut Criticized Karan Johar: ‘करण जोहर तुला लाज वाटायला हवी, तू...’; ‘रॉकी और रानी’ सिनेमावरून कंगना रणौत भडकली, रणवीरलाही सुनावलं

सोनू सूदचा बॉलिवूडचा स्टार ते गरिबांचा मसिहा हा प्रवास इतका सोपा नाही. त्याने आयुष्यात बराच संघर्ष केला आहे. सोनू सूदचा जन्म ३० जुलै १९७३ रोजी झाला. सोनू ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनू सूदने अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्याने १९९९ मध्ये 'कल्लाझागर' या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तो सोनू 'कहां हो तुम', 'मिशन मुंबई', 'युवा', 'आशिक बनाया आपने' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला. सोनू सूदने हिंदी सिनेमांव्यतिरिक्त तेलुगू, तामिळ आणि कन्नड इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे. सोनू सूद जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आला तेव्हा त्याच्याकडे फक्त ५५०० रुपये होते. (Bollywood Film)

सोनू सूदच्या वडिलांचे कपड्यांचे दुकान होते. त्यांनी आपल्या मुलाला अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी नागपूरला पाठवले. सोनू सूद मुंबईत आला तेव्हा त्याच्या खिशात फक्त ५५०० रुपये होते. त्यानंतर सोनू सूदचा संघर्ष सुरू झाला. सोनूने 1996 मध्ये लग्न केले. लग्न केल्यानंतर 3 वर्षांनी सोनू सूदने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली. 3 वर्षानंतर त्याला शहीद-ए-आझम हा पहिला बॉलिवूड चित्रपट मिळाला. त्याला 2004 च्या युवा चित्रपटानंतर मोठा ब्रेक मिळाला. 2010 च्या दबंगनंतर सोनू सूदने मागे वळून पाहिले नाही.

Sonu Sood Turns 50
Akash Thosar Video : काय झाडी, काय डोंगर अन् काय तो धबधबा; आकाश ठोसरने भरपावसात घेतला गरमागरम भजीचा आस्वाद

सोनू सूद कोरोनाच्या काळात गरिबांचा मसिहा बनला

अभिनेता सोनू सूद 2020 मध्ये स्थलांतरित मजुरांसाठी 'मसिहा' म्हणून उभा राहिला. एका मुलाखतीदरम्यान सोनू सूदने आपला संघर्ष शेअर केला. तो म्हणाला , 'जेव्हा मी मुंबईला आलो, तेव्हा मी ट्रेनने आलो आणि माझ्याकडे कोणतेही आरक्षण नव्हते. मी नागपूरला इंजिनीअरिंग करत होतो तेव्हा आरक्षणावर मी बस आणि ट्रेनमध्ये प्रवास करायचो.

Sonu Sood Turns 50
Maharashtrachi Hasya Jatra New Season : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे नवे पर्व सुरू होणार; यावेळी कोणकोणते कलाकार पोटधरून हसवणार?

जेव्हा मी त्या स्थलांतरितांना त्यांच्या मुलांसह, वडिलधाऱ्यांसोबत रस्त्यावर फिरताना पाहिलं, तेव्हा तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ वाटला. मग मी ठरवले की मी घरी बसून ही परिस्थिती पाहू शकत नाही. त्यामुळे मी या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आलो'. आता सोनू सूद नेहमी गरजूंच्या मदतीसाठी उभा राहतो. सोनू सूद हा रिल लाईफमध्ये हिरो आहेच, परंतु रिअल लाईफमध्ये तो 'हिरो नं १' आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com