Kangana Ranaut Criticized Karan Johar: ‘करण जोहर तुला लाज वाटायला हवी, तू...’; ‘रॉकी और रानी’ सिनेमावरून कंगना रणौत भडकली, रणवीरलाही सुनावलं

Kangana Ranaut Post: देशभरात ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ला संमिश्र प्रतिसाद मिळत असून कंगनाने करण जोहरच्या चित्रपटावर चांगलीच टीका केली आहे.
Kangana Ranaut Criticized Karan Johar
Kangana Ranaut Criticized Karan JoharSaam Tv
Published On

Kangana Ranaut Criticized Karan Johar

रणवीर आणि आलिया प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. करण जोहर दिग्दर्शित चित्रपटाला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

चित्रपटातील काही सीनमुळे नेटकऱ्यांनी दिग्दर्शकाला आणि निर्मात्यांना कमालीचे ट्रोल केले आहे. तर चित्रपटातील गाण्यांमुळे आणि आलिया- रणवीरच्या लव्हस्टोरीमुळे त्या दोघांचेही कौतुक होत आहे.

पण सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असलेल्या चित्रपटावर आता कंगना भडकली आहे. कंगनाने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत अभिनेत्रीने करण जोहरच्या चित्रपटावर चांगलीच टीका केली आहे.

Kangana Ranaut Criticized Karan Johar
Maharashtrachi Hasya Jatra New Season : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे नवे पर्व सुरू होणार; यावेळी कोणकोणते कलाकार पोटधरून हसवणार?

करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ला पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ११. १० कोटींची कमाई केली असून हा चित्रपट एकूण १६० कोटींमध्ये निर्मित झालेला आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रामच्या माध्यमातून करण जोहरवर टीका केली आहे.

आपल्या स्टोरीमध्ये ती म्हणते, “भारतीय प्रेक्षक न्यूक्लियर वेपण आणि अणुविज्ञानाच्या आधारित असलेले ३ तासांचा चित्रपट पाहत आहेत. इथे ही नेपोटिझमची गँग एकच सासू आणि सूनेची स्टोरी प्रेक्षकांना दाखवते. पण खरंच २५० कोटींची गरज का आहे? करण जोहर, एकच चित्रपट अनेकवेळा करताना तुला लाज वाटली पाहिजे.”

“तू स्वतःला भारतीय चित्रपटसृष्टीचा ध्वजवाहक म्हणतो. पैसे वाया घालवू नको, हा चित्रपटसृष्टीतला कठीण काळ आहे. निवृत्त हो आणि नवीन चित्रपट निर्माते येऊ दे जे नवीन आणि चांगले चित्रपट बनवतील.”

Kangana Ranaut Criticized Karan Johar
Kangana Ranaut Criticized Karan JoharInstagram

तर त्याच्या स्टोरीमध्ये अभिनेता पुढे म्हणतो, “रणवीर माझा तुला एक प्रामाणिक सल्ला आहे, तू करण जोहरसारख्या कपड्यांची फॅशन वापरू नकोस. त्याने सामान्य माणसासारखे कपडे घालावेत, जसे जुन्या काळामध्ये धरम जी आणि विनोद खन्ना घालायचे. काही भारतीय लोक स्वतःला हिरो म्हणवणाऱ्या कार्टून दिसणाऱ्या माणसाला ओळखत नाहीत. कृपया तुम्ही दाक्षिणात्य अभिनेत्यांना पाहा ते कसे कपडे घालतात आणि स्वतःला कशाप्रकारे टापटीप ठेवतात.”

Kangana Ranaut Criticized Karan Johar
Dharmendra And Shabana Azmi Liplock Scene: धर्मेंद्र-शबाना आझमींचा लिपलॉक सीन; नेटकरी जाम भडकले, दोघांवर ट्रोलधाड
Kangana Ranaut Criticized Karan Johar
Kangana Ranaut Criticized Karan JoharInstagram

करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’च्या कमाईबद्दल बोलायचे तर, करण जोहर दिग्दर्शित चित्रपटाने पहिल्या दिवशी ११.१० कोटींची कमाई केली आहे. १६० कोटींच्या बजेटमध्ये निर्मित झालेल्या या चित्रपटात कलाकारांनी बक्कळ मानधन घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com