Dharmendra And Shabana Azmi Liplock Scene: धर्मेंद्र-शबाना आझमींचा लिपलॉक सीन; नेटकरी जाम भडकले, दोघांवर ट्रोलधाड

Rocky Aur Rani Kii Prem Kahani Film: करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ मध्ये सध्या एका सीनची तुफान चर्चा होत आहे.
Dharmendra And Shabana Azmi Liplock Scene
Dharmendra And Shabana Azmi Liplock SceneSaam Tv
Published On

Dharmendra And Shabana Azmi Trolled: ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत रणवीर सिंह, आलिया भट्टसोबत धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन आणि मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग हे कलाकार आहेत. पण सध्या कमाई करीता चर्चेत राहिलेला हा चित्रपट एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला. या चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांनी लिपलॉक केलं आहे. सध्या या लिपलॉक सीनची चर्चा तुफान चर्चा होत आहे.

Dharmendra And Shabana Azmi Liplock Scene
Taali Teaser : सुष्मिता सेनच्या ‘ताली’चा टीझर प्रदर्शित ; 'गाली से ताली तक' श्रीगौरी सावंतचा थक्क करणार प्रवास

करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ मध्ये सध्या एका सीनची तुफान चर्चा होत आहे. चित्रपटात शबाना आझमी आणि धर्मेंद्र या दोघांमध्ये एक इंटीमेट सीन दाखवण्यात आला आहे. त्यावरून सध्या नेटकरी त्या दोघांनाही वयावरून फोटोंवर मजेदार कमेंट करत आहेत. चित्रपटात धर्मेंद्रने रणवीरच्या आजोबाची भूमिका साकारली आहे, तर जया बच्चन यांनी चित्रपटात रणवीरच्या आजीची भूमिका साकारली. पण तरी देखील हे दोघेही घरात एका अनोळख्या व्यक्तीप्रमाणे राहतात.

चित्रपटाच्या कथानकात दाखवल्याप्रमाणे, लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरसुद्धा धर्मेंद्र शबाना आझमींच्या प्रेमात पडलेले दाखवले आहे. रणवीर आणि आलिया हे धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांना पुन्हा एकदा चित्रपटात एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यानंतर या दोघांचाही लिपलॉकचा सीन दाखवण्यात आला आहे. आजपर्यंत कधीही न पाहिलेला सीन दाखवल्यामुळे सर्वच आश्चर्यचकित झाले आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर धर्मेंद्र आणि शबानाच्या किसिंग सीनवर फॅन्सनी नाराजी व्यक्त केली. (Bollywood Film)

Dharmendra And Shabana Azmi Liplock Scene
Draupadi Movie : यज्ञसेनी कादंबरीवर येणार चित्रपट; 'द्रौपदी'चे मोशन पोस्टर प्रदर्शित

चित्रपटातील त्या दृश्यांवर युजर्स नकारात्मक प्रतिक्रिया देत म्हणतात, ‘धर्मेंद्र आणि शबाना जी तुमच्या लिपलॉकची अशी गोष्ट होती, ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. मला आश्चर्य वाटलं.’ तर आणखी एक जण कमेंट करत म्हणतो, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी पाहिला. काहीही कामाचा विषय नाही. चित्रपट शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला समर्थन करतो. हा कसला कौटुंबिक चित्रपट?’

तर आणखी एक म्हणतो, ‘ जिथे आलिया आणि रणवीर चित्रपटात दर पाच मिनिटांनी किस घेत आहेत. आपआपल्या जबाबदारीवर हा चित्रपट पहा. जया बच्चन यांनी केलेला अभिनय कौतुकास्पद आहे.’ अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. (Trolled)

Dharmendra And Shabana Azmi Liplock Scene
Rocky Aur Rani Kii Prem Kahaani 1st Day Collection: आलिया- रणवीरचा ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’बॉक्स ऑफिसवर हिट की फ्लॉप?, पहिल्या दिवशी झाली इतकी कमाई

करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ चित्रपट २ तास ४८ मिनिटांचा आहे. चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना फारच आवडला असून दुसरा भाग प्रेक्षकांना आवडला नाही. अनेकांना हा चित्रपट आवडला आहे. चित्रपट समीक्षक आणि ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाने केलेल्या कमाईबद्दल सांगितले, करण जोहर दिग्दर्शित चित्रपटाने पहिल्या दिवशी ११.१० कोटींची कमाई केली आहे. १६० कोटींच्या बजेटमध्ये निर्मित झालेल्या या चित्रपटात कलाकारांनी बक्कळ मानधन घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com