Rocky Aur Rani Kii Prem Kahaani 1st Day Collection: आलिया- रणवीरचा ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’बॉक्स ऑफिसवर हिट की फ्लॉप?, पहिल्या दिवशी झाली इतकी कमाई

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani Box Office Collection: करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
Rocky Aur Rani Kii Prem Kahaani 1st Day Box Office Collection
Rocky Aur Rani Kii Prem Kahaani 1st Day Box Office CollectionTwitter

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani 1st Day Box Office Collection: ‘मिशन इम्पॉसिबल’, ‘ओपेनहाइमर’ आणि ‘बार्बी’ची सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई सुरू आहे. आता या चित्रपटांच्या शर्यतीत आणखी एक चित्रपटाची भर पडली आहे.

करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ नुकताच २८ जुलैला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘गली बॉय’नंतर आलिया आणि रणवीर ही जोडी पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर दिसणार आहे.

चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू होती. अशातच चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा प्रेक्षकांसमोर आला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani 1st Day Box Office Collection
Tejashri Pradhan New Serial : तेजश्री प्रधान सांगणार 'प्रेमाची गोष्ट'; कधी, केव्हा आणि कुठे पाहता येणार नवी मालिका

‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’च्या माध्यातून करणने तब्बल सात वर्षाच्या मोठ्या गॅपनंतर दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा सुरू आहे.

नुकताच ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ हा चित्रपट थिएटरमध्ये अखेर प्रदर्शित झाला असून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.चित्रपट समीक्षक आणि ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाने केलेल्या कमाईबद्दल सांगितले, करण जोहर दिग्दर्शित चित्रपटाने पहिल्या दिवशी ११.१० कोटींची कमाई केली आहे.

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani 1st Day Box Office Collection
Televison Actress Arrested: ७५ वर्षीय आजोबांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं; प्रसिद्ध अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, खळबळजनक घटना!

१६० कोटींच्या बजेटमध्ये निर्मित झालेल्या या चित्रपटात कलाकारांनी बक्कळ मानधन घेतले. रणवीरने २५ कोटी तर, आलियाने १० कोटी तर, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांनी प्रत्येक १ कोटी इतकं मानधन आकारलं आहे. आलिया- रणवीरची क्यूट लव्हस्टोरी असलेल्या चित्रपटाची कमाई अपेक्षेप्रमाणे नाही. पहिल्या वीकेंडला हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

चित्रपटात प्रेक्षकांना बंगाली मुलगी आणि पंजाबच्या मुलाची जबरदस्त लवस्टोरी पाहायला मिळणार आहे. रणवीरच्या पात्राचे नाव रॉकी रंधावा असे आहे तर, आलियाने रानीचे पात्र साकारलेय. ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’चं कथानक इथिता मोइत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिलं असून चित्रपटाची निर्मिती करण जोहर, हिरो जोहर आणि अपूर्व मेहताने केले आहे.

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani 1st Day Box Office Collection
Kedar Shinde Share Video : खूप खूप मोठे व्हा! १०५ वर्षांच्या आजीने पाहिला 'बाईपण भारी देवा', व्हिडीओ तुफान व्हायरल

चित्रपटात प्रमुख भूमिकेत रणवीर सिंह, आलिया भट्टसोबत धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन आणि मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोगनेही प्रमुख भूमिका साकारलीय. चित्रपट देशभरातील ३२०० हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com