Televison Actress Arrested: ७५ वर्षीय आजोबांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं; प्रसिद्ध अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, खळबळजनक घटना!

Tv Actress And Friend Arrested In Honey Trapping: टेलिव्हिजन दाक्षिणात्य अभिनेत्रीला आणि तिच्या मैत्रिणीला पोलिसांनी हनी ट्रॅपिंग प्रकरणी अटक केली आहे.
Tv Actress And Friend Arrested In Honey Trapping
Tv Actress And Friend Arrested In Honey TrappingSaam Tv
Published On

Tv Actress And Friend Arrested In Honey Trapping: टेलिव्हिजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीला आणि तिच्या मित्राला पोलिसांनी हनी ट्रॅपिंग प्रकरणी अटक केली आहे. त्या दोघांनीही मिळून एका वृद्ध व्यक्तीला हनी ट्रॅप प्रकरणात अडकवून त्याच्याकडून ११ लाख रुपये उकळले आहेत.

ही घटना केरळ राज्यातील परवूर जिल्ह्यातील आहे. नित्या सासी ही ३२ वर्षांची असून मलयालपुझा, पठानमथिट्टा येथील रहिवासी आह. तर परावूर जिल्ह्यातील बिनू कलाईकोडे येथील दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

Tv Actress And Friend Arrested In Honey Trapping
Kedar Shinde Share Video : खूप खूप मोठे व्हा! १०५ वर्षांच्या आजीने पाहिला 'बाईपण भारी देवा', व्हिडीओ तुफान व्हायरल

तिरुवअनंतपुरम मधील ७५ वर्षीय माजी सैनिक आणि केरळ विद्यापीठाच्या माजी कर्मचाऱ्याकडून त्या दोघींनीही ११ लाख रुपये उकळल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

अभिनेत्रीने घर भाड्याने देण्याचे निमित्त साधत ७५ वर्षीय माजी सैनिकाशी संपर्क साधला होता. ही घटना २४ मे पासून घडलीय. अभिनेत्रीने त्या ७५ वर्षीय वृद्धाच्या घरी जाऊन त्याच्यासोबत मैत्री केलीय.

दाखल केलेल्या तक्रारीप्रमाणे, अभिनेत्रीने त्या वृद्ध व्यक्तीला त्याच्या घरात धमकावून त्याला कपडे काढण्यासाठी बळजबरी करत त्याचे फोटोही काढले आहेत. या प्रकरणात अभिनेत्रीचा मित्र देखील सहभागी होता.

Tv Actress And Friend Arrested In Honey Trapping
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah 15 Years Completed: ‘तारक मेहता...’ ची १५ वर्ष, ‘हसो हसाओ’ची थीम करत निर्मात्यांसह कलाकारांनी केलं सेलिब्रेशन

पुढे त्या व्यक्तीचे फोटोवापरून त्या दोघांनीही वृद्ध व्यक्तीकडे २५ लाखांची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

वृद्ध व्यक्तीला अनेक दिवस धमक्या दिल्यानंतर अखेर त्या वृद्धाने त्यांना ११ लाख रुपये दिले. आता हे प्रकरण संपेल, असे त्या वृद्धाला वाटले, मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा पैशांची मागणी केली.

पैशांची मागणी आणखीनच वाढल्यानंतर १८ जुलै रोजी त्या वृद्ध व्यक्तीने परावूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. दरम्यान, याप्रकरणी अभिनेत्री आणि तिच्या मित्राला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com