Kedar Shinde Share Video
Kedar Shinde Share VideoSaam TV

Kedar Shinde Share Video : खूप खूप मोठे व्हा! १०५ वर्षांच्या आजीने पाहिला 'बाईपण भारी देवा', व्हिडीओ तुफान व्हायरल

Ajjibai Appreciated Marathi Movie : १०५ वर्षांच्या आजीबाईने केले 'बाईपण भारी देवा' कौतुक.
Published on

Kedar Shinde SHare Video Of 105 year Old Ajji : बाईपण भारी देवा चित्रपटाची महाराष्ट्रभर चर्चा आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन उद्या एक महिना होईल. चित्रपटाची क्रेझ आणि कलेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशाने चित्रपटचो संपूर्ण टीम भारावून गेली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे या चित्रपटविषयीच्या अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतच असतात. केदार शिंदे यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

Kedar Shinde Share Video
Hemant Dhome Share Post : जगातला तुझा सगळ्यात मोठा चाहता… हेमंत ढोमने भरभरून केलं पत्नीचं कौतुक

केदार शिंदे यांची पोस्ट

केदार शिंदे यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका आजी दिसत आहेत. आजी व्हिडीओमध्ये 'बाईपण भारी देवा' चित्रपट पाहिल्याचे सांगत आहेत. आजी म्हणाल्या की, “मला हा चित्रपट खूप खूप आवडला. तुम्हाला माझा आशीर्वाद. तुम्ही खूप खूप मोठे व्हा आणि असेच पुढे जात राहा.”

तर केदार शिंदे यांनी आजींचा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, "आणखीन काय हवंय आयुष्यात? वय वर्षे १०५... थिएटरमध्ये येऊन सिनेमा पाहिला. आणि त्याची प्रतिक्रिया सुध्दा कळवली. आजी ROCKS''

केदार शिंदे यांच्या या पोस्टवर सुकन्या मोने, सानवी रवींद्र, साईप्रसाद निंबाळकर यांनी कमेंट केल्या आहेत. (Latest Entertainment News)

'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने ६५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. महिलांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने अनेक मराठी चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा सावंत चौधरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com