Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Marathi Actor Home Fraud: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेते सतीश नायकोडे यांची एसआरए प्रकल्पात घर मिळवून देण्याच्या बहाण्याने २५ लाखांची फसवणूक झाली. वर्षभरापासून न्यायासाठी ते पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत.
Actor Home Fraud
Actor Home Fraud
Published On

संघर्ष गांगुर्डे/साम टीव्ही न्युज/डोंबिवली

Marathi Actor Home Fraud: 'क्राइम पेट्रोल' या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते सतीश नायकोडे यांची तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांची घर घेण्यावरुन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात गेल्या वर्षभरापासून न्याय मिळावा म्हणून ते पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत असल्याचे त्यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम उपनगरातील सांताक्रूज येथील एसआरए प्रकल्पात घर मिळवून देण्याचे आश्वासन देत सतीश नायकोडे यांचा आस्था प्रॉपर्टीजचा फोन आला. घराचे स्वप्न पूर्ण होईल, या विश्वासाने त्यांनी संबंधितांकडे मोठी रक्कम जमा केली. या व्यवहारासाठी अधिकाऱ्यांच्या सह्या, शिक्के, स्टॅम्प पेपरवरील कागदपत्रे आणि लेखी करार दाखवण्यात आल्यामुळे त्यांचा विश्वास आणखी दृढ झाला.

Actor Home Fraud
Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

मात्र, कालांतराने घराचा कोणताही ताबा मिळाला नाही. उलट, आपण फसवणुकीचे बळी ठरलो असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणात त्यांच्याकडून सुमारे २५ लाख रुपये उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर सतीश नायकोडे यांच्यासमोर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट उभे राहिले. न्यायासाठी गेल्या वर्षभरापासून विविध पोलीस ठाण्यांमध्ये पाठपुरावा करत असताना त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कुटुंबावर ओढवलेल्या या प्रसंगामुळे ते भावनिकदृष्ट्याही खचले.

Actor Home Fraud
Weight Loss: वजन कमी करायचंय पण भातही खायचाय? दुपार की रात्री...; भात कधी खाल्ल्यास मिळतो जास्त फायदा

आपली व्यथा मांडताना सतीश नायकोडे यांना अश्रू अनावर झाले. या कठीण काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याचेही त्यांनी सांगितले. सततच्या मानसिक तणावामुळे आपण आत्महत्येचाही प्रयत्न केला होता, असा धक्कादायक खुलासाही त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी सतीश नायकोडे यांनी केली आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून फसवणुकीत सहभागी असलेल्या व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com