

शकिराच्या कॉन्सर्टआधीच घडली मोठी दुर्घटना
कॉन्सर्टसाठी स्टेज सेटअप करताना क्रू मेंबरचा मृत्यू
क्रू मेंबरच्या मृत्यूने परिसरात शोककळा
Shakira Brazil Concert Crew Member Death: ग्लोबल पॉप स्टार शकिराच्या कॉन्सर्टआधीच मोठी दुर्घटना घडली आहे. ब्राझीलमध्ये होणार्या फ्री कॉन्सर्टसाठी स्टेज सेटअप करताना क्रू मेंबरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कॉन्सर्ट होण्याआधी घडलेल्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
कोलंबियाची पॉप स्टार शकिराच्या ब्राझीलमध्ये होणाऱ्या कॉन्सर्टआधी घडलेल्या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमधील प्रसिद्ध कोपाकबाना समुद्र किनाऱ्यावर ही घटना घडली. शकिराच्या 'Todo Mundo no Rio' या शोसाठी स्टेज तयार करण्यात येत होता.
स्टेजच्या सेटअपचे काम करताना २६ एप्रिल रोजी ही दुर्घटना घडली. या शोसाठी स्टेज सेटअप तयार करताना एका वजनदार वस्तूच्या वजनाखाली क्रू मेंबर दबला गेला. या घटनेत क्रू मेंबरचा जागीच मृत्यू झाला. क्रू मेंबरचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर सेटअपच्या वजनदार वस्तू खाली दबल्या गेल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
दुर्घटना घडल्यानंतर क्रू मेंबरला रुग्णालयात दाखल केले होते. परंतु रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी क्रू मेंबरला मृत घोषित केले. या घटनेनंतर पॉप स्टार शकिरानेही दु:ख व्यक्त केलं आहे. 'मृत व्यक्तीचे कुंटुबीय, मित्र आणि सहकाऱ्यांसाठी ही बाब खूपच दु:खद आहे', अशी तिने प्रतिक्रिया दिली.
आयोजकांनी मृत क्रू मेंबरच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिलं आहे. तसेच त्यांनी संवेदना देखील व्यक्त केल्या. रिपोर्टनुसार, पॉप स्टार शकिराचा कॉन्सर्ट शेड्युलनुसार २ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. कोपाकबाना समुद्र किनाऱ्यावर हा फ्री कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.