Sonu Nigam : 30 हजारांच्या गर्दीत हरवला मुलगा; सोनू निगमने LIVE शोमध्ये 'असा' घेतला कुटुंबाचा शोध, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

Sonu Nigam Viral Video : प्रसिद्ध गायक सोनू निगमचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात त्याने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये हरवलेल्या मुलाला त्याच्या कुटुंबाकडे सुखरूप पोहचवले.
Sonu Nigam Viral Video
Sonu Nigam saam tv
Published On
Summary

सोनू निगमच्या लाइव्ह कॉन्सर्टला चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळते.

सोनू निगमचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सोनू निगमने खूपच हुशारीने हरवलेल्या मुलाला त्याच्या कुटुंबाकडे सुखरूप पोहचवले.

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम सध्या त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याने आपल्या आवाजाने जगाला वेड लावले आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोमवारी, कर्नाटकातील हुबळी येथे सोनू निगमने एक लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये जवळजवळ 30,000 चाहत्यांनी हजेरी लावली होती.

सोनू निगमच्या लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान एक छोटा मुलगा गर्दीत हरवला. आपल्या कुटुंबापासून वेगळा झाला. तेव्हा सोनू निगमने खूप हुशारीने त्या मुलाची त्याच्या कुटुंबासोबत भेट घडवून दिली. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सोनू निगम हलक्याफुलक्या विनोदी पद्धतीने घाबरलेल्या मुलाला शांत केले. त्यानंतर गाण्याच्या माध्यमातून त्याच्या आई-वडीलांना हाक मारली. सोनूने गाणे बोलून मुलांच्या पालकांना शोधण्याचा प्रयत्न केला. सोनू गायला, "श्री साई आ जाओ, मम्मी पापा इसको ले जाओ इसके मम्मी पापा खो गए, जल्दी आकर इसको ले जाओ" हे ऐकताच सर्वजण हसू लागेल आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

सोनूने गमतीने मुलाला विचारले, "पापा-मम्मी तुम्हारे बिना मस्ती कर रहे हैं, पता है?" मुलाने निरागसपणे उत्तर दिले, "पापा इथे नाहीत." सोनू आश्चर्यचकित झाला. त्यानंतर मुलाने तो काकासोबत आल्याचे सांगितले. त्यानंतर सोनू निगमने मुलाच्या आवाजाची नक्कल केली आणि म्हणाला, "चाचू, कहां हैं? अरे चाचा, छोड़कर चाची के साथ चले गए? बड़े भाई ने जिम्मेदारी दी तुम्हें बच्चे की और तुम ये कर रहे हो." त्यानंतर प्रॉडक्शन टीमने मुलाच्या काकाला शोधले. त्यानंतर ओळख पटवून सोनू निगमने मुलाला त्याच्यासोबत पाठवले.

चाहते करतात कौतुक

हरवलेल्या मुलाला पुन्हा त्याच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. सोनू निगमच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. चाहते त्याचे खूपच कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, "प्रेक्षकांचा एक सेकंदही वाया न घालवता मुलाचे कुटुंब शोधले. सादरीकरण आणि मनोरंजन दोन्ही पाहायला मिळाले." सोनू निगम सध्या देशभरात त्याच्या 'दीवाना तेरा' कॉन्सर्ट टूरसह लाइव्ह परफॉर्म करत आहे. ही टूर डिसेंबर 2025 मध्ये गुवाहाटी येथे सुरू झाली. येत्या काही दिवसांत तो आणखी अनेक स्टेज शो करणार आहे.

Sonu Nigam Viral Video
Jui Gadkari : "रस्ते नाहीत, खूप त्रास झालाय..."; मढ आयलँडची भीषण परिस्थिती पाहून जुई गडकरी भडकली, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com