Salman Khan Torn Shoes
Salman Khan Torn ShoesSaam Tv

Salman Khan Torn Shoes: 300 कोटी कमावूनही सलमान खानवर आली फाटलेले बूट घालण्याची वेळ?, फोटो होतोय व्हायरल

Salman Khan Photo Viral: अलिझेहच्या 'फर्रे' या चित्रपटाचे शानदार स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला बॉलिवूडच्या अनेक बड्या स्टार्सने हजेरी लावली.
Published on

Salman Khan Tiger 3 Movie:

बॉलीवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या 'टायगर ३' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. आता सलमान खानने निर्मिती केलेला 'फर्रे' चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खानची भाची अलिजेह अग्नीहोत्री बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. या चित्रपटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकताच अलिझेहच्या 'फर्रे' या चित्रपटाचे शानदार स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला बॉलिवूडच्या अनेक बड्या स्टार्सने हजेरी लावली. या कार्यक्रमातील व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमातील सलमान खानच्या एका फोटोने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने फाटलेले शूज घातला असल्याचे दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सलमान खानचा हा फोटो एका मुलाखतीदरम्यान काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या फोटोच्या पार्श्वभूमीवर 'टायगर 3' चित्रपटाचे पोस्टर आहे. फोटोमध्ये सलमानने ब्लॅक कलरचा शर्ट आणि त्याच कलरची पँट परिधान केली आहे. सलमानने पायामध्ये ब्लॅक कलरचे बूट घातले आहेत. यामधील एक बूट फाटलेला आहे. याच बूटाने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Salman Khan Torn Shoes
Dunki रिलीज होण्यापूर्वी किंग खानने चाहत्यांना दिला जबरदस्त सल्ला, म्हणाला - 'सीट मिळणार नाही म्हणून घरातूनच...'

या फोटोत सलमान खानने घातलेला बूट फाटलेलाच नाही तर जुना दिसत आहे. इतकंच नाही तर हे बूट खूपच खराब झाल्याचे दिसत आहे. सलमान खान फाटलेले बूट घालून मुलाखतीला आल्याचे बोलले जात आहे. पण असे असताना देखील सलमान खान पूर्ण आत्मविश्वासाने माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहे. हा फोटो व्हायरल होताच चाहत्यांकडून सलमान खानचे कौतुक केले जात आहे.

Salman Khan Torn Shoes
Parineeti Chopra चे सासरचं घर आहे खूपच आलिशान, अभिनेत्रीने शेअर केले इनसाइड फोटो

सलमान खानच्या या फोटोवर कमेंट्स करत एका यूजरने लिहिले- 'तू किती डाउन टू अर्थ आहे.' दुसर्‍याने लिहिले- 'फोटो काढण्याच्या वेळी त्याचे बूट फाटला असावा. त्याला बदलायला वेळ मिळाला नसावा.' तर तिसऱ्याने लिहिले की, 'कदाचित ही फॅशन असू शकते.' दरम्यान, सलमान खान नुकताच 'टायगर 3' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही. हा चित्रपट रिलीज होऊन 11 दिवस झाले. तरी देखील तो बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा आकडा गाठू शकलेला नाही.

Salman Khan Torn Shoes
CLUB 52 Teaser: फक्त पत्त्यांचा नाही, हा खेळ आहे डेरिंगचा..., राणादाच्या 'क्लब 52'चा धमाकेदार टीजर पाहिलात का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com