सलमान- कतरिनाचा बहुप्रतिक्षित ‘टायगर ३’ चित्रपट रविवारी (१२ नोव्हेंबरला) प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून चित्रपटाने आपल्या हटक्या कमाईचा आकडा कायम ठेवला होता. पण चौथ्या दिवसापासून चित्रपटाच्या कमाईचा आलेख घसरताना दिसत आहे.
सलग तिसऱ्या दिवशीही कमाईचा आकडा कमी पाहायला मिळत आहे. पण जगभरातील आकडा बराच मोठा आहे. चित्रपट जगभरामध्ये लवकरच ३०० कोटींचा आकडा पार करणार असून एकट्या भारतामध्ये चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार केलेला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सॅकल्निकच्या अहवालानुसार, पहिल्या आठवड्यामध्ये चित्रपटाने एकट्या भारतात १८७ कोटींची कमाई केली आहे. हिंदी आवृत्तीमध्ये १८३ कोटी, तेलुगू आवृत्तीमध्ये ४.२ कोटी तर तमिळ आवृत्तीमध्ये जेमतेम ६३ लाख रुपयेच कमावले आहे. पहिले तीन दिवस चित्रपटाने धडाकेबाज कमाई केल्यानंतर चौथ्या दिवसापासून चित्रपटाच्या कमाईला उतरती कळा लागली आहे. चौथ्या दिवशी चित्रपटाने फक्त २१ कोटी तर पाचव्या दिवशी जेमतेम १८ कोटींची कमाई केली आहे. जर चित्रपटाचा आलेख असाच घसरता राहिला, तर लवकरच चित्रपटाला आपला गाशा गुंडाळत थिएटरमधून बाहेर पडावे लागेल.
सॅकल्निकच्या अहवालानुसार, सहाव्या दिवशी चित्रपटाने फक्त १३ कोटींचीच कमाई केली आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमी आकडा आहे. जरीही असं असलं तरी, चित्रपटाने भारतामध्ये आतापर्यंत २०० कोटींचा टप्पा गाठला आहे. तर जगभरामध्ये सहाव्या दिवसापर्यंत चित्रपटाने २९७ कोटींच्या आसपास कमाई केली आहे. लवकरच चित्रपट जगभरामध्ये ३०० कोटींच्याही क्लबमध्ये सामील होईल, असं म्हणायला वावगं ठरणार नाही.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अर्थात १२ नोव्हेंबरला हा चित्रपट जगभरामध्ये रिलीज झाला आहे. सलमान खानने चित्रपटामध्ये, रॉ एजंट टायगरचे पात्र, तर कतरिनाने आयएसआय एजंट झोयाचे पात्र साकारले. तर इमरान हाश्मी एका खतरनाक व्हिलनच्या भूमिकेचे पात्र साकारणार आहे.
मनिष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ १० नोव्हेंबर २०२३ रोजी अर्थात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. ‘एक था टायगर’चा हा ट्रायोलॉजी (तिसरा भाग) आहे. पहिला भाग ‘एक था टायगर’, दुसरा भाग ‘टायगर झिंदा हैं’ हा होता. हे दोन्ही भाग सुपरहिट ठरले होते. आता तिसरा भाग म्हणजे ‘टायगर ३’ रिलीज होणार असून हा भाग देखील सुपरहिट ठरेल अशी अपेक्षा केली जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.