Suhana Khan: पहिल्यांदाच वडिलांसोबत स्क्रिन शेअर करणार सुहाना खान, 'बादशाह'च्या नव्या चित्रपटाचे अपडेट्स आले समोर

Suhana Khan Share Screen With Father Shah Rukh Khan: सुजॉय घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. हा एक अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट असणार आहे.
Suhana Khan Share Screen With Father Shah Rukh Khan
Suhana Khan Share Screen With Father Shah Rukh KhanSaam Tv
Published On

Shah Rukh Khan And Suhana Khan Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानला (Shah Rukh Khan) मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक असतात. त्याच्या चित्रपटाची ते आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षामध्ये शाहरुख खान चाहत्यांसाठी तीन जबरदस्त चित्रपट घेऊन आला. यामधील जवान आणि पठान हे दोन चित्रपट सुपरहिट ठरले. तर आता त्याच्या 'डंकी' चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत आहेत.

हा चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार असून तो देखील सुपरहिट ठरेल असा अंदाज वर्तवला जात आहे. अशामध्ये शाहरूख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) देखील तिचा डेब्यू फिल्म 'द आर्चीज'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान दोघांच्याही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सुहाना लवकरच वडिलांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, सुहाना खान पहिल्यांदाच वडील शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. शाहरुख आणि सुहाना मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, वडील आणि मुलीची ही जोडी लवकरच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. सुजॉय घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. हा एक अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट असणार आहे. जानेवारीमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनचे काम पूर्ण झाले आहे.

शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित 'डंकी' चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये चार मित्र दाखवले आहेत. ज्यांचे इंग्लंडला जाण्याचे स्वप्न असते. या सर्व मित्रांची जबाबदारी हार्डीच्या म्हणजेच शाहरुख खानच्या खांद्यावर असते. या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त तापसी पन्नू आणि विकी कौशल देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. डंकी चित्रपटापूर्वी शाहरुख खानच्या 'पठाण' आणि 'जवान' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. त्यामुळे आता डंकी चित्रपटातून देखील चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

सुहाना खानच्या डेब्यू चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर, झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' या चित्रपटातून सुहाना खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. हा चित्रपट 7 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सुहाना खानसोबत बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नातू अगस्त्य नंदा यांच्या नावाचा समावेश आहे. या सर्वांसोबत मिहिर आहुजा, आदिती सहगल, युवराज मेंडा आणि वेदांग रैना हे देखील या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com