Fighter Star Cast Fees: 'फायटर'साठी हृतिक रोशनने घेतलं तगडं मानधन, इतर कलाकारांची फी किती?

Hrithik Roshan Fighter Movie Fees: या चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. आता सर्वजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटामधील कलाकारांनी तगडे मानधन घेतलं आहे.
Fighter Starcast Fees
Fighter Starcast FeesSaam Tv
Published On

Fighter Movie:

बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याच्या बहुप्रतिक्षित 'फायटर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात हृतिक रोशनसोबत दीपिका पदुकोण, अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 25 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटातील पोस्टर, टीझर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. मकर संक्रांतीच्यानिमित्ताने निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. या चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. आता सर्वजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटामधील कलाकारांनी तगडे मानधन घेतलं आहे. कोणत्या कलाकाराला किती फी मिळाली हे आज आपण जाणून घेणार आहोत...

हृतिक रोशन -

'फायटर' या चित्रपटात हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हृतिक रोशनचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटासाठी हृतिक रोशनने 50 कोटी रुपये फी घेतली आहे.

दीपिका पदुकोण -

'फायटर' चित्रपटात दीपिका पदुकोण जबरदस्त स्टाईलमध्ये दिसणार आहे. दीपिका पदुकोणने 15 कोटी रुपये मानधन घेतले आहे.

अनिल कपूर -

'फायटर' चित्रपटातील अनिल कपूरची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. 'फायटर' चित्रपटासाठी अनिल कपूरला 7 कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे.

करण सिंग ग्रोव्हर -

करण सिंग ग्रोव्हरने 'फायटर' चित्रपटासाठी 2 कोटी रुपये मानधन घेतले आहेत. या चित्रपटात करण सिंग ग्रोव्हर पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.

Fighter Starcast Fees
साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna कुठे फिरतायत?, फोटो झाले व्हायरल

अक्षय ओबेरॉय -

'फायटर' चित्रपटात पायलटच्या भूमिकेत दिसणार्‍या अक्षय ओबेरॉयला फी म्हणून एक कोटी रुपये देण्यात आले आहेत. 'फायटर' या चित्रपटात तो महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

चित्रपटाचे बजेट -

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या 'फायटर' चित्रपटाचे बजेट 250 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सिद्धार्थ आनंदकडे आहे.

Fighter Starcast Fees
K J Joy Dies: प्रसिद्ध संगीतकार काळाच्या पडद्याआड!; २०० हून अधिक चित्रपटांना दिलं संगीत

भारतातील पहिला अ‍ॅक्शन चित्रपट -

हृतिक रोशनचा 'फाइटर' हा भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन चित्रपट असेल. यापूर्वी आकाशात चित्रित केलेल्या दृश्यांसाठी व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. पण या चित्रपटातील दृश्य खरी आहेत.

Fighter Starcast Fees
Sidharth Malhotra Net Worth: सिद्धार्थची भारतासह परदेशातही हवा, अभिनेत्याची संपत्ती पाहून उडतील तुमचेही होश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com