Dhak Dhak Trailer Out: ४ बाइक राइडर्स महिलांच्या प्रवासाची कहाणी, 'धक धक'चा भन्नाट ट्रेलर रिलीज

Dhak Dhak Trailer Released: या चित्रपटामध्ये फातिमा सना शेखसोबत रत्ना पाठक शाह, दिया मिर्झा आणि संजना संघी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.
Dhak Dhak Trailer Out
Dhak Dhak Trailer OutSaam Tv
Published On: 

Fatima Sana Shaikh Movie Trailer:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री फातिमा सना शेखच्या (Fatima Sana Shaikh) आगामी 'धक धक' चित्रपटाची (Dhak Dhak Movie) गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटामध्ये ४ बाइक राइडर महिलांच्या प्रवासाची कहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये फातिमा सना शेखसोबत रत्ना पाठक शाह, दिया मिर्झा आणि संजना संघी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट बाइकर महिलांवर आधारित आहे.

Dhak Dhak Trailer Out
Akshay Kumar Video: पुन्हा तीच चूक! ट्रोलिंग होऊनही अक्षय कुमारने पुन्हा केली पानमसाल्याची जाहिरात, नेटिझन्सनी घेतली चांगलीच शाळा

'धक धक' चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. हा भन्नाट ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'धक धक' चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या ४ महिला ज्यांचे बाइकवरून लेह लडाखला जाण्याचे स्वप्न आहे आणि ते एकमेकांच्या मदतीने त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करतात. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

'धक धक' चित्रपटाचा ३ मिनिटांचा ट्रेलर प्रेक्षकांना कथेतील ४ मुख्य पात्रांची ओळख करून देतो. या ४ महिलांना बाइक चालवायला आवडते. ट्रेलरमध्ये पुढे दिसते की काही मुलं बाइक चालवण्यावरून रत्ना पाठक शाह यांची चेष्टा करतात. ज्याला अभिनेत्री योग्य उत्तर देताना दिसत आहे. यानंतर ते सर्व जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्त्याच्या दिशेने प्रवास सुरू करण्याचा विचार करतात. ते लडाखच्या लेह जिल्ह्यात बाइक राइडिंगसाठी जाण्याचा निर्णय घेतात. त्यांचा प्रवास देखील सुरू होतो. यावेळी त्यांना आलेल्या अडचणी चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.

Dhak Dhak Trailer Out
Gadkari Teaser: 'या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्याने होईल, तेव्हा...', 'गडकरी'चा टीझर रिलीज

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये या महिलांच्या धाडसाची एक झलक पाहायला मिळते. वेगवेगळ्या धर्माचे असूनही लोक एकत्र कसे राहतात हे देखील या ट्रेलरच्या माध्यमातून सांगितले आहे. 'धक धक'चे दिग्दर्शन तरुण डुडेजा करत आहेत. तर या चित्रपटाची कथा पारिजात जोशी यांनी लिहिली आहे. Taapsee Pannu's Outsiders Films आणि Viacom 18 Studios ने BLM Pictures च्या सहकार्याने 'धक धक' ची निर्मिती केली आहे. फातिमाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत फातिमाने लिहिले की, 'कधीकधी, तुम्हाला तुमची स्वप्न जगण्याची संधी घ्यावी लागते.' हा चित्रपट १३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dhak Dhak Trailer Out
Sankarshan karhade : '३६ दिवस,२१ विमान प्रवास, हजारो मैलांचं अंतर...' अमेरिका दौऱ्यावर संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.