Gadkari Teaser: 'या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्याने होईल, तेव्हा...', 'गडकरी'चा टीझर रिलीज

Union Minister Nitin Gadkari Biopic: या चित्रपटाच्या पोस्टरनंतर आता चित्रपटाचा टीझर रिलीज (Gadkari Movie Teaser) करण्यात आला आहे. हा टीझर खूपच जबरदस्त आहे.
Nitin Gadkari Biopic Announcement
Nitin Gadkari Biopic AnnouncementInstagram

Gadkari Movie Teaser Out:

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. गडकरी यांच्या आयुष्यावर आधारीत 'गडकरी' चित्रपट (Gadkari Movie) येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती.

या चित्रपटाबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या पोस्टरनंतर आता चित्रपटाचा टीझर रिलीज (Gadkari Movie Teaser) करण्यात आला आहे. हा टीझर खूपच जबरदस्त आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता खूपच वाढत चालली आहे.

ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित 'गडकरी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित झाले आहे. नितीन गडकरी या नावाला भारतात जितका सन्मान आहे तितकेच हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदरणीय आहे. अशा व्यक्तिमत्वाला जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर आऊट झाले होते. त्यावेळी नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याविषयीची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. या टीझरमध्येही गडकरीची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता कायम राहिली आहे.

Nitin Gadkari Biopic Announcement
Akshay Kumar Video: पुन्हा तीच चूक! ट्रोलिंग होऊनही अक्षय कुमारने पुन्हा केली पानमसाल्याची जाहिरात, नेटिझन्सनी घेतली चांगलीच शाळा

गडकरी चित्रपटाच्या टीझरची सुरुवातच 'या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्याने होईल, तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी...' या ओळीने होते. नितीन गडकरी त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच एक प्रगतशील भारत नावारूपास आला. त्यामुळे त्यांची बांधिलकी ही केवळ राजकारणाशी नसून समाजकारणाशीही आहे याचा प्रत्यय आपल्याला टीझरमधून येत आहे.

टीझरमध्येही नितीन गडकरींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा चेहरा दिसत नाहीये. त्यामुळे प्रेक्षकांना हा अभिनेता कोण हे जाणून घेण्यास खूपच उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाचा दमदार टीझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. परंतु ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण नितीन गडकरींचा हा जीवनपट येत्या २७ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Nitin Gadkari Biopic Announcement
Tejaswini Pandit: 'राजसाहेब तुम्हीच महाराष्ट्राला वाचवा...' टोलच्या मुद्द्यावरुन तेजस्वीनी पंडितची पोस्ट चर्चेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com