Ankita Lokhande Pregnancy: '...फक्त देवाची इच्छा असली पाहिजे', गरोदरपणाच्या चर्चांवर अंकिता लोखंडे स्पष्टच बोलली

Ankita Lokhande And Vicky Jain: अशामध्ये आता अंकिता लोखंडेनेच या चर्चांवर मौन सोडत या अफवा असल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिले आहे.
Ankita Lokhande Pregnancy
Ankita Lokhande PregnancySaam TV
Published On

Ankita Lokhande On Pregnancy Rumours:

बॉलिवूड आणि टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Actress Ankita Lokhande) प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. अंकिता आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत असल्यामुळे ती प्रेग्नेंट (Ankita Lokhande Pregnancy) असल्याच्या चर्चांना वेग आला होता. अशामध्ये आता अंकिता लोखंडेनेच या चर्चांवर मौन सोडत या अफवा असल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिले आहे.

Ankita Lokhande Pregnancy
Akshay Kumar Visited Mahakal: वाढदिवशी अक्षय कुमार महाकालच्या चरणी, कुटुंबीयांसह घेतलं दर्शन; VIDEO आला समोर...

अंकिता लोखंडेने नुकताच ETimes ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या प्रेग्नेंसीबाबत होत असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी अंकिताने सांगितले की, 'मी काही पहिली सेलिब्रिटी नाही, जी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अशा निराधार बातम्या ऐकत राहतो. हे प्रत्येक सेलिब्रिटीसोबत घडते. जेव्हा तुम्ही सिंगल असता तेव्हा तुम्हाला सतत प्रश्न विचारला जातो की लग्न कधी करणार. अंदाज लावला जातो की लग्न झाले असावे किंवा होणार आहे. त्यानंतर जेव्हा तुमचे लग्न होते. तेव्हा बातम्या येतात की तुम्ही प्रेग्नेंट आहात किंवा तुम्हाला मुलं होत नाही. हे प्रश्न तुम्हाला सतत विचारले आणि बातम्यांमध्ये लिहिले जातात. कधी-कधी ते घटस्फोटाबाबतही बोलू लागतात. मला वाटतं हे सगळं मीडियात घडत राहतं.'

Ankita Lokhande Pregnancy
Jawan Box Office Collection Day 2: बॉक्स ऑफिसवर 'जवान'चा धुमाकूळ, दुसऱ्या दिवशीही रेकॉर्डब्रेक कमाई

या मुलाखतीदरम्यान अंकिताला विचारण्यात आले की, अशा बातम्यांचा तिच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतो का? यावर तिने सांगितले की, 'मी माझ्याबद्दल अनेक मीम्स पाहिले आहेत. माझे मॉर्फ केलेले फोटो फेक बेबी बंप दाखवतानाही पाहिले आहेत. खरे सांगायचे तर या गोष्टींचा माझ्या आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही. मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. उलट अशा गोष्टी पाहून मला हसू येते. हे सगळं बघून मला एवढंच वाटतं की त्यांना काही कामं नाहीत.'

Ankita Lokhande Pregnancy
Akshay Kumar Birthday: 'खिलाडी'ला अक्षय कुमार नाव कसं पडलं?, वेटरच नाही तर शिपायाचीही केली नोकरी; आज आहे बॉलिवूडचा सर्वात महागडा अभिनेता

अंकिताने पुढे असे देखील सांगितले की, 'मी अजून कोणतेही प्लॅनिंग केलेले नाही. देवाची इच्छा असेल तेव्हा घडते. मग ते करिअर असो, लग्न असो वा मुलं. ज्याला यावे लागेल तो येईल तेव्हा येईल. त्याला कोणीही रोखू शकत नाही, फक्त देवाची इच्छा त्याच्यामध्ये असली पाहिजे.' असं सांगत अंकिता लोखंडेने ती प्रेग्नेंट असलेल्याचा चर्चांना पूर्णविराम दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com