Akshay Kumar Birthday: 'खिलाडी'ला अक्षय कुमार नाव कसं पडलं?, वेटरच नाही तर शिपायाचीही केली नोकरी; आज आहे बॉलिवूडचा सर्वात महागडा अभिनेता

HBD Akshay Kumar: दिल्लीच्या चांदणी चौकपासून ते मुंबई फिल्म इंडस्ट्रीपर्यंतच्या प्रवासात अक्षयला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
Akshay Kumar Birthday
Akshay Kumar BirthdaySaam Tv

Happy Bday Akshay Kumar:

बॉलिवूडचा (Bollywood) 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Actor Akshay Kumar) ९ सप्टेंबरला म्हणजे आज आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. ९ सप्टेंबर १९६७ रोजी अमृतसरमध्ये अक्षयचा जन्म झाला. अक्षय कुमारचा सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास खूपच खडतर होता. दिल्लीच्या चांदणी चौकपासून ते मुंबई फिल्म इंडस्ट्रीपर्यंतच्या प्रवासात अक्षयला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आपल्या अथक प्रयत्नांनंतर अक्षयला बॉलिवूडमध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यात यश आलं. अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याचा बालिवूडमधील प्रवास आणि त्याच्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत...

Akshay Kumar Birthday
Amitabh Bachchan Purchased Property: बिग बींनी मुंबईत खरेदी केलं नवं ऑफिस, प्रॉपर्टीची किंमत मोजतच राहाल...

अक्षय कुमारचा जन्म पंजाबच्या अमृतसहमध्ये झाला. अक्षय कुमारचे वडील हरिओम भाटिया हे मिलिटरी ऑफिसर होते.अक्षय कुमारचे बालपण दिल्लीतल्या चांदणी चौकमध्ये गेले. तिथेच तो मोठा झाला. त्यानंतर तो मुंबईमध्ये आला. मुंबईतील खालसा कॉलेजमध्ये अक्षय कुमारने शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने आपले शिक्षण अर्धवट सोडून बँकॉकला जाऊन मार्शल आर्टचे शिक्षण घेतले. बँकॉकमध्ये आपला खर्च चालवण्यासाठी त्याने वेटरचे काम केले होते. बँकॉकमध्ये एका मित्राने त्याला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याने मॉडेलिंगला सुरुवात केली. मीडिया रिपोर्टनुसार अक्षयने पहिली नोकरी कोलकात्यामध्ये शिपाई म्हणून केली होती.

Akshay Kumar Birthday
Sunny Deol Crying Video: ...अन् सनी देओल सर्वांसमोर ढसाढसा रडला, असं काय झालं की अभिनेत्याला रडू आवरलं नाही?

अक्षय कुमार बॉलिवूडचा सर्वात महागडा अभिनेता आहे. हाय पेड अभिनेत्यांच्या यादीमध्ये त्याचे नाव घेतले जाते. अक्षय कुमार वर्षाला ३ ते ४ चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम करतो. अक्षय कुमार एका चित्रपटासाठी ८० ते १०० कोटी रुपये फी घेतो. त्याची वर्षाची कमाई ५०० कोटींच्या आसपास आहे. चित्रपटांव्यतिरिक्त अक्षय कुमार जाहिरातीमधून देखील मोठी कमाई करतो. तसंच सोशल मीडियाच्या एका पोस्टसाठी अक्षय कुमारला एक कोटी रुपये मिळतात.

Akshay Kumar Birthday
Jawan Movie Producer Trolled: किंग खानचा 'जवान' साऊथ चित्रपटाची कॉपी, निर्माते अ‍ॅटली यांच्यावर कथा चोरल्याचा आरोप

२०१७ च्या एका मुलाखतीत अक्षय कुमारने 'मिड डे'ला सांगितले होते की, मला चित्रपटात सात सेकंदांसाठी कास्ट करण्यात आले होते. कुमार गौरव या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत होता आणि त्यानेच मला अक्षय म्हणून हाक मारली. मला माहित नाही का? माझे नाव राजीव होते आणि ते इतके वाईटही नव्हते. मात्र अक्षय नाव ऐकल्यानंतर मला माझे नाव बदलावेसे वाटले. त्यामुळे मी वांद्रे न्यायालयात गेलो आणि माझे नाव बदलून अक्षय कुमार ठेवले आणि माझ्यासोबत प्रमाणपत्र आणले. अक्षय कुमारचा 'खिलाडी' चित्रपट सुपरहिट ठरला त्यामुळे त्याला बॉलिवूडचा खिलाडी देखील म्हटले जाते.

Akshay Kumar Birthday
Samantha Ruth Prabhu In Politics: समांथा रुथ प्रभू लवकरच सोडणार फिल्म इंडस्ट्री, अभिनेत्रीनंतर आता दिसणार राजकारणीच्या रुपात?

अक्षय कुमारचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे. त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव 'केप ऑफ गॉड फिल्म' आहे. या प्रोडक्शन हाऊसमधून अनेक चित्रपट प्रोड्यूस झाले आहेत. अक्षय कुमारचे मुंबईमध्ये चार फ्लॅट, एक बंगला आणि एक डुप्लेक्स आहे. मुंबई व्यतिरिक्त अक्षय कुमारचे गोव्यामध्ये आलिशान बंगला आहे. भारतासोबत परदेशातही अक्षयची दोन घरं आहेत. अक्षय कुमारकडे अनेक आलिशान गाड्या देखील आहेत.

अक्षय कुमारने १९९१ मध्ये ‘सौगंध’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात त्याच्यासोबत राखी आणि शांतीप्रिया या अभिनेत्री मुख्य भूमिकेत होत्या. यानंतर अक्षयने 'खिलाडी', 'मैं खिलाडी तू अनारी', 'खिलाडीयो का खिलाडी', 'मिस्टर अँड मिसेस खिलाडी', 'खाकी', 'टॉयलेट', 'स्पेशल २६', 'बेबी', 'एअरलिफ्ट', 'पॅडमॅन' आणि 'मिशन मंगल','OMG', OMG 2' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. अक्षयने आतापर्यंत १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com