Ira Khan Insta Post
Ira Khan Insta PostSaam Tv

Ira Khan And Nupur Shikhar Wedding: तो घोड्यावर आला नाही..., नुपूर शिखरेला वेडिंग ड्रेसवरून ट्रोल करणाऱ्यांची आयरा खानने बोलती केली बंद

Nupur Shikhare Trolled After Wedding Dressing: आयरा खानच्या लग्नापेक्षा त्याचा जावई नुपूर शिखरेच्या वेडिंग ड्रेसची आणि वरातीची जोरदार चर्चा होत आहे. आमिर खानचा जावई नुपूर आपल्या नवरीला घेऊन जाण्यासाठी जॉगिंग करत आला होता.
Published on

Ira Khan And Nupur Shikhare Wedding Video:

बॉलिवूडचा (Bollywood) मिस्टर 'परफेक्शनिस्ट' अर्थात अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी मुलगी आयरा खान (Ira Khan) बुधवारी विवाहबंधनात अडकली. आयरा खान (Ira Khan) तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये कोर्ट मॅरेज केले. या लग्नाला दोघांच्या कुटुंबातील जवळचे व्यक्ती आणि मित्र परिवाराने हजेरी लावली.

आयरा खानच्या लग्नापेक्षा त्याचा जावई नुपूर शिखरेच्या वेडिंग ड्रेसची आणि वरातीची जोरदार चर्चा होत आहे. आमिर खानचा जावई नुपूर आपल्या नवरीला घेऊन जाण्यासाठी जॉगिंग करत आला होता. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे. अशामध्ये नुपूरच्या पत्नीने म्हणजे आयराने या ट्रोलर्सला जबरदस्त उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे.

आयरा आणि नुपूरच्या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा होत असून त्याचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुपूर शिखरे आपल्या लग्नाला जर हटके स्टाइलमध्ये पोहचला. लग्नाचे ठिकाण असलेल्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये नुपूर टीशर्ट आणि शॉर्ट्समध्ये जॉगिंग करत पोहचला. जवळपास 8 किलोमीटर्यंत नुपूर धावत आला. त्यानंतर नुपूरने त्याच ड्रेसिंगवर आयरा खानसोबत मॅरेज सर्टिफिकेटवर सही केली. आमिर खानच्या जावयाच्या या लूकमुळे तो सोशल मीडियावर खूपच ट्रोल होत आहे. नुपूरला ट्रोल करणाऱ्यांना त्याच्या पत्नीने म्हणजेच आयराने चांगलेच उत्तर दिलं आहे.

आयरा खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर तिच्या लग्नातील नवरा नुपूरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने नुपूरचा त्याच्या मित्रांसोबत जॉगिंग करत लग्नाच्या ठिकाणी पोहण्याचा फोटो देखील जोडला आहे. यासोबतच तिने ट्रोलर्सला उत्तर देखील दिले आहेत. तिने या फोटोवर लिहिले की, ‘तो घोड्यावर आला नाही. तो कार्यक्रमाच्या ठिकाणी धावत आला आणि वाटेत सुंदर पोस्टर लावले.'

Ira Khan Insta Post
Deepika Padukone Bday: दीपिका पदुकोण मॉडेलपासून अशी बनली बॉलिवूडची टॉप अभिनेत्री, आज आहे इतक्या कोटींची मालकीण

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये आयरा खान तिच्या लग्नाच्या कार्यक्रमात नूपूरच्या ड्रेसिंगबद्दल पाहुण्यांशी बोलताना दिसली होती. आयराने पाहुण्यांना नुपूरला थोडा वेळ माफ करण्यास सांगितले होते. कारण नुपूरला आंघोळ करून कार्यक्रमासाठी तयार व्हावे लागले. आंघोळीनंतर नूपुरने निळ्या रंगाची शेरवानी घातली होती. यानंतर, नुपूर आणि आयरा यांनी कुटुंबीयांसोबत फोटोसेशन केले. त्यानंतर मीडियासमोर आले. या दोघांच्या साध्या ड्रेसिंग स्टाईलने सर्वांचे मन जिंकले. दरम्यान, आयरा 8 जानेवारीला उदयपूरमध्ये रितीरिवाजानुसार नूपूरसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचसोबत मुंबईत ग्रँड रिसेप्शन पार्टी देखील होणार आहे.

Ira Khan Insta Post
Sarita Mehendale: 'भागो मोहन प्यारे' फेम अभिनेत्रीला पुत्ररत्न , नववर्षाच्या पहिल्याच दिवशीच केलं बाळाचं स्वागत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com