Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा मॉर्फिंग फोटो प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीला अटक झाली, पण...

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल केल्याप्रकरणी दिल्लीतील आरोपीला अटक झाली होती. मात्र, अटकेतील कायदेशीर चुकांमुळे मुंबई न्यायालयाने त्याला मुक्त करण्याचे आदेश दिले.
Sonakshi Sinha
Sonakshi SinhaSaam Tv
Published On: 

Sonakshi Sinha: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दिल्लीतील एका व्यक्तीला अटक केली होती. मात्र, मुंबईतील न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर ठरवत आरोपीला मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांकडून अटकेदरम्यान आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचे पालन न झाल्यामुळे न्यायालयाने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

सोनाक्षी सिन्हाने दाखल केली होती तक्रार

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाक्षी सिन्हाने १३ नोव्हेंबर २०२६ रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. दिल्लीतील एका व्यक्तीने तिचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप तिने केला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि आर्यन दीपक जैन या व्यक्तीला दिल्लीमधून अटक केली. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजून ११ मिनिटांनी दिल्लीतील शाहदरा येथील जगतपुरी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्यानंतर त्याला मुंबईतील वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले.

Sonakshi Sinha
Amitabh Bachchan Threat: अमिताभ बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबईत २०० जण तयार असल्याचा व्हायरल पोस्टमध्ये दावा

पोलिसांनी मागितली होती तीन दिवसांची कोठडी

सुनावणीदरम्यान मुंबई पोलिसांनी आरोपीची तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. सोनाक्षीचे मॉर्फ केलेले फोटो तयार करण्यासाठी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा माध्यम वापरण्यात आले, याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. तसेच या प्रकरणातील इतर बाबींची चौकशी करण्यासाठी आरोपीची कोठडी आवश्यक असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र, आरोपीच्या वकिलांनी पोलिसांच्या या मागणीला विरोध केला. आरोपीला अटक करण्यापूर्वी आवश्यक नोटीस देण्यात आली नव्हती आणि अटकेची कारणेही सांगण्यात आली नव्हती, असा युक्तिवाद त्यांनी केला.

Sonakshi Sinha
Bigg Boss 20: विकेंड का वारमध्ये सलमान खानसमोर स्काउटओपीचा मोठा खुलासा; काश्वी हिरानंदानीसोबत केली एंगेजमेंट

दिल्लीतील न्यायालयात हजर न केल्याने अटक बेकायदेशीर

या प्रकरणात न्यायालयाने पोलिसांच्या कारवाईवर महत्त्वाचे चुका नोंदवल्या. आरोपीला दिल्लीतून अटक केल्यानंतर तेथील स्थानिक दंडाधिकारी न्यायालयात हजर करणे आवश्यक होते. मात्र, पोलिसांनी आरोपीला थेट मुंबईत आणले. या प्रक्रियेचे पालन का केले नाही, याचे समाधानकारक उत्तर पोलिसांकडून देण्यात आले नाही. याशिवाय, आरोपीवर लावण्यात आलेल्या गुन्ह्यांसाठी सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम ३५ मधील अटकेसंबंधी नियमांचे पालन करणे आवश्यक होते. मात्र, अटकेची गरज सांगणारी कारणे योग्य प्रकारे नोंदवण्यात आली नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

केवळ पुढील तपास करायचा आहे, या कारणावरून एखाद्या व्यक्तीला अटक करता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचे पालन न झाल्यामुळे आरोपीची अटक बेकायदेशीर ठरवण्यात आली आणि त्याला मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. अटकेच्या प्रक्रियेतील चुका असल्यामुळे न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोनाक्षी सिन्हा मॉर्फ फोटो प्रकरणातील पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.