Priyanka Chopra : देसी गर्लची बेली डायमंड रिंग पाहिलीत का? एअरपोर्टचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, किंमत वाचून थक्क व्हाल

Priyanka Chopra Belly Diamond Ring Price : नुकतीच प्रियांका चोप्रा एअरपोर्टवर स्पॉट झाली. तेव्हा तिच्या लूकने लक्ष वेधून घेतले. प्रियांकाची बेली डायमंड रिंग पाहा आणि त्याची किंमत जाणून घ्या. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Priyanka Chopra Belly Diamond Ring Price
Priyanka Chopra SAAM TV
Published On

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) कायमच आपल्या स्टाइल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या ती अमेरिकेत पती निक जोनससोबत स्थायिक आहे. त्यांना एक गोड मुलगी देखील आहे. प्रियांका,निक आणि त्यांची लेक मालती मेरी अनेक वेळा एकत्र स्पॉट होतात. प्रियांका बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये ही काम करते. मात्र आता ती एका साऊथ प्रोजेक्टवर काम करत आहे. याच दरम्यान प्रियांका चोप्रा नुकतीच मुंबईतील प्रायव्हेट विमानतळावर स्पॉट झाली आहे.

प्रियांकाचा खास लूक

पापाराझींनी प्रियांका विमानतळाबाहेर एका खाल लूकमध्ये कॅमेऱ्यात कैद केले आहे. प्रियांका चोप्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रियांकाच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तिच्या एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती म्हणजे तिची बेली डायमंड रिंग. या रिंगवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. तिने केलल्या बेली पिअर्सिंगमुळे प्रियांका खूपच स्टायलिश आणि हटके दिसत आहे. प्रियंकाच्या बेली रिंगची किंमत वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

डायमंड बेली रिंगची किंमत?

प्रियांका चोप्राची ही डायमंड बेली रिंग (Belly Diamond Ring Price ) तब्बल 2.7 कोटी रुपयांची आहे. तिचा हा एअरपोर्टवरील व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून त्या डायमंड बेली रिंगने लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये प्रियांका ब्लॅक क्रॉप टॉप, प्रिंटेड पँट आणि मॅचिंग जॅकेट परिधान केले आहे. तिचा हा लूक खूपच भन्नाट आहे. डोळ्यावर गॉगल आणि मोकळे केसांमध्ये प्रियांका कूल दिसत आहे. बाजूला शानदार ऑडी देखील आहे. ज्यात बसून प्रियांका गेली.

प्रियांका चोप्रा सध्या एस एस राजामौली यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. SSMB29 असे चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा, महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहे. प्रियांका चोप्राच्या या आगामी चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Priyanka Chopra Belly Diamond Ring Price
Sikandar Release Date : सलमाननं घेतली मोठी रिस्क, 'सिकंदर' रविवारी रिलीज होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com