World Obesity Day: काही केल्या बेली फॅट कमी होत नाहीये? तज्ज्ञांनी सांगितलं हार्मोन्सच्या 'या' टेस्ट आजच करून घ्या

World Obesity Day: हाराचं पथ्य, व्यायाम यांना अचानक सुरुवात होते. वजन कमी व्हावे, पोटाची घेरी जावी यासाठी अनेकजण निरोगी जीवनशैली जोपासतात.
World Obesity Day
World Obesity Daysaam tv
Published On

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे वजनात वाढ होतेय. जसजसा वजनाचा काटा नियंत्रणाबाहेर जातो तसं धडकी भरू लागते. यामध्ये बेली फॅट म्हणजेच पोटाचा घेर देखील वाढतो. वजन कसं कमी करता येईल यासाठी आपण प्रयत्न सुरु करतो. आहाराचं पथ्य, व्यायाम यांना अचानक सुरुवात होते. वजन कमी व्हावे, पोटाची घेरी जावी यासाठी अनेकजण निरोगी जीवनशैली जोपासतात. मात्र असं करूनही पोटाचा घेर कमी होत नसेल तर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही हार्मोन्स टेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे.

या सर्व प्रक्रियेत शरीरातील नियंत्रण हार्मोन्स बदल महत्वाची भूमिका बजावते, असं डॉक्टराचं म्हणणं आहे. पोटाची घेरी घटवताना कोणते घटक अडथळे ठरत आहे, याची माहिती हार्मोन्स चाचणीतील अहवालातून कळते.

वजन नियंत्रण करताना शरीरातील हार्मोन्सचे कार्य

न्यूबर्ग अजय शहा लॅबचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह म्हणाले की, माणसाच्या शरीरात हार्मोन्स हे रासायनिक वाहनाचं काम करतं. शरीरातील चयापचयक्रिया, भूक लागणं, शरीरात अन्न गेल्यानंतर पचनक्रियेतून तयार होणाऱ्या चरबीची साठवण करण्याच्या प्रक्रियेचे नियंत्रण हार्मोन्स पार पाडतात. शरीरातील हार्मोन्सच जर अनियंत्रित झाले तर ही संपूर्ण प्रक्रिया बिघडू लागते. परिणामी शरीरातील वजन कमी करण्याच्या प्रक्रिया होत नाही आणि वजन यंत्रणासाठी पोटातील चयापचय क्रिया बाधित होते.

'या' हार्मोन्सची चाचणी करायलाच हवी

इन्सुलिन

इन्सुलिन हे मुळात स्वादुपिंडामध्ये तयार होणारं हार्मोन आहे. शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचं कार्य इन्सुलिनद्वारे होतं. कधीतरी स्वदुपिंडात इन्सुलिन प्रतिरोध परिस्थिती निर्माण होते आणि शरीराच्या पेशी याला कमी प्रतिसाद देतात. परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि पोटावरील चरबीचा साठा वाढू शकतो.

कॉर्टीसोल

शरीरावर येणाऱ्या ताण-तणावासाठी जबाबदार कॉर्टीसोल हार्मोन असतं. हे हार्मोन पचनक्रिया आणि चरबी साठवणुकीच्या प्रक्रियेशी संबंधित असतं. अतिप्रमाणातील ताणामुळे कॉर्टीसोलची पातळी वाढते, परिणामी ओटीपोटावर चरबी जमा होते.

कॉर्टीस्टॉल चाचणी करणे आवश्यक असून या चाचणींद्वारे शरीरावर येणाऱ्या तणावाची नेमकी पातळी समजून घेण्यास मदत होते. तुमचे शरीर तणावाच्या कोणत्या पातळीचा सामना करते आहे, याची माहिती मिळाल्यास वजन नियंत्रणातील बाधाही लक्षात येईल.

थायरॉईड हार्मोन्स

थायरॉईड ग्रंथीमधून तयार होणाऱ्या हार्मोन्सचा शरीरातील चयापचय क्रियेवर परिणाम होत असतो. थायरॉईड हार्मोन्स एक्टिव्ह नसतील तर शरीरातील पचनक्रिया मंदावते आणि वजन वाढते.

लॅप्टीन

शरीरातील चरबी वाढवणाऱ्या रक्तातील लॅप्टीन हार्मोनची निर्मिती होते. यामध्ये माणसाला भूक लागणे, शरीरातील अन्न पचवणे या दोन महत्त्वाच्या प्रक्रियेवर लॅप्टीन हार्मोन कार्य करतं. कधीकधी मेंदू या कार्यात बिघाड आणतो. जर मेंदूने लॅप्टीन कडून येणाऱ्या सिग्नलला प्रतिसाद दिला नाही तर लॅप्टीन प्रतिरोध स्थिती निर्माण होते. यामध्ये माणसाला गरजेयुक्त अन्नापेक्षाही जास्त भूक लागतं आणि वजन वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com