मुलाकडून मिठी, आईकडून दुर्लक्ष; कंगना- जया पुन्हा एकदा ट्रोल

'ऊंचाई' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी सर्वांचेच लक्ष वेधले ते, कंगना आणि जया बच्चन यांनी. या दोघींची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
Kangana Ranaut And Jaya Bachchan
Kangana Ranaut And Jaya Bachchan
Published On: 

Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही सोशल मीडियावर आपल्या धडाकेबाज कामगिरीने चर्चेत असते. सोबतच अनेकदा ती काही बेधडक मुद्द्यांवरुन नेटकऱ्यांकडून ट्रोल होत असते. मुंबईत काल रात्री झालेल्या 'उंचाई' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला कंगनाने हजेरी लावली होती.

सोबतच यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीसुद्धा हजेरी लावली होती. यावेळी सर्वांचेच लक्ष वेधले ते, कंगना आणि जया बच्चन यांनी. या दोघींची पुन्हा सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Kangana Ranaut And Jaya Bachchan
Kantara Movie: थिएटरमध्ये धुमाकूळ घालणारा 'कांतारा' OTT वर येणार का? आली मोठी अपडेट

स्क्रिनिंगमध्ये झालेल्या घटनेमुळे प्रत्येकाच्या नजरा त्यांच्यावर आहे. बुधवारी मुंबईत झालेल्या ' उंचाई'च्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन अनुपम खेर यांनी केले होते. या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अनुपम खेर सर्व कलाकारांचे स्वागत करताना दिसत आहे. या स्क्रिनिंगला बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन देखील उपस्थित होत्या. सोबतच त्यावेळी कंगनाने सुद्धा हजेरी लावली होती.

Kangana Ranaut And Jaya Bachchan
Priyanaka Chopra: 'संध्याकाळी 7 वाजल्यानंतर मला भिती वाटते', असे प्रियांका चोप्रा का म्हणाली?

यावेळी कंगना आणि जया बच्चन दोघीही एकमेकींच्या समोर होत्या. यावेळी पापराझींनी दोघींना एकत्र पाहून ओरडायला सुरुवात केली. पण त्यावेळी जया बच्चन यांनी कंगनाला पाहत दुर्लक्ष केले, त्या नंतर जया बच्चन यांनी भाग्यश्रीकडे पाहत भाग्यश्रीला मिठी मारली. हा सर्व प्रकार पापराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाला.

'उंचाई'च्या स्पेशल स्क्रिनिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आणखी एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत अमिताभ बच्चन कंगना राणौतला मिठी मारताना हसताना दिसत आहे. या घटनेवर ट्रोलर्सने आपले मत मांडले.

सोशल मीडियावर कमेंट्समधून ट्रोलर्स म्हणतात, "कंगना राणौतला वाईट वाटलं असावं की जया बच्चन इथेही आल्या आहेत'', तर काही ट्रॉलर्स म्हणतात, ''जया बच्चन कंगनाला घाबरतात." त्या स्क्रिनिंग दरम्यानच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत अभिषेक बच्चन आणि कंगना राणौत एकमेकांशी मोकळेपणाने बोलताना दिसत असून एकमेकांना मिठी मारत, हसत हसत गप्पा मारताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com