Priyanaka Chopra: 'संध्याकाळी 7 वाजल्यानंतर मला भिती वाटते', असे प्रियांका चोप्रा का म्हणाली?

प्रियांका चोप्राने तीन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करत ती लखनऊमध्ये युनिसेफसोबत फील्ड ट्रिपवर जात असल्याची माहिती दिली होती
Priyanka Chopra visit UP
Priyanka Chopra visit UPSaam Tv

Priyanaka Chopra Latest Update: चित्रपट अभिनेत्री आणि युनिसेफची गुडविल ॲम्बेसिडर प्रियांका चोप्राने नुकतीच उत्तर प्रदेशातील लखनौला भेट दिली. यावेळी प्रियंकाने मुलांचे शिक्षण, पोषण, सुरक्षितता आणि त्यांच्या आरोग्य सुविधांबाबत केलेल्या कामाचा आढावा घेतला. यादरम्यान प्रियांकाने काही शाळांमध्ये जाऊन मुलांची भेट घेतली. तसेच प्रियांकाने महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या वुमन पॉवर लाईनच्या नियंत्रण कक्षात जाऊन अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

Priyanka Chopra visit UP
Urfi Javed Latest Video: हिरेजडीत जाळीदार स्कर्ट घालून आली उर्फी जावेद, अंगावरचा कोटही उतरवला...

तिच्या या दौऱ्याचा एक व्हिडिओ प्रियांकाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये प्रियांका महिलांच्या सुरक्षेबाबत चिंतेत असल्याचे दिसून आले. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती एका महिला पोलिस अधिकाऱ्यांना विचारत आहे , "तुम्ही मला एक गोष्ट सांगा. यूपीसारख्या राज्यात, लखनौमध्ये जिथे मी सुद्धा लहानाची मोठे झाले आहे. थोडी भीती नेहमीच असते... विशेषतः संध्याकाळी सात नंतर." यावर महिला पोलीस अधिकारी यांनी प्रियंकाला 'मी तुम्हाला डेटा दाखवते' असे म्हटले आहे.

प्रियांका चोप्रा पोलीस अधिकाऱ्यांसह वुमन पॉवर लाईनच्या कंट्रोल रूममध्ये जाते, तसेच तेथील काम पाहते. यादरम्यान, एक महिला पोलीस अधिकारी कॉल ट्रॅकिंग युनिटबद्दल माहिती देताना म्हणतात, "हे लोक पोलिस नाहीत... कारण आम्हाला तटस्थ लोक हवे होते. पोलिस हे प्रकरण लपवू शकतात, त्यामुळे तटस्थता राखली जावी म्हणून आम्ही अशी यंत्रणा आणली आहे. हे लोक प्रशिक्षित आहेत. ते 24 तास, 8-8 तासांच्या शिफ्टमध्ये काम करतात.

प्रियांका चोप्रा या व्हिडिओमध्ये यूपी पोलिसांना अनेक प्रश्न विचारताना दिसत आहे. प्रियंकाने विचारले, "तुम्हाला वाटते का की यूपीसारख्या राज्यात जिथे मुली घाबरून असतात आणि इथे महिलांविरुद्धचे जास्त गुन्हे होतात, तिथे डिजिटायझेशनमुळे पोलिसिंग थोडे सोपे झाले आहे का?" यावर पोलिस अधिकारी म्हणतात, "अगदी". अधिकारी पुढे म्हणतात, "फक्त तंत्रज्ञान हा उपाय नाही आणि मॅन्युअल पोलिसिंग देखील नाही. पण जेव्हा आम्ही या दोघांना एकत्र आणेल आहे, तेव्हा जे घडले ते उत्तम आहे." त्यानंतर प्रियांकाने संपूर्ण टीमसोबत फोटो देखील काढला. (Police)

प्रियांका चोप्राने तीन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करत ती लखनऊमध्ये युनिसेफसोबत फील्ड ट्रिपवर जात असल्याची माहिती दिली होती. यादरम्यान तिने सांगितले की तंत्रज्ञानाने कसे बदल घडवून आणले आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये मुलांसाठी आणि महिलांसाठी परिस्थिती कशी बदलली आहे. (Video)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com