'लग्नापूर्वी मी कुणासोबत शरीरसंबंध आणि कुणासोबत नाही..' बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीचं स्टेटमेंट चर्चेत

Deepika Padukones Statement: अभिनेत्री दीपिका पदुकोण कायम आपल्या थेट वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहिली आहे. काही वर्षांपूर्वी तिनं रिलेशनशिपवर बोल्ड स्टेटमेंट केलं होतं.
Deepika Padukones Statement
Deepika Padukones StatementSaam
Published On

बॉलिवूड अभिनेत्री दीपीका पदूकोण कायम बोल्ड आणि थेट विधानांसाठी चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी तिनं नातेसंबंध आणि नातेसंबंधांबद्दल मोठं विधान केलं आहे. तिनं रिलेशनशिपवर केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दीपीका पदूकोण लग्नाआधीपासून पर्सनल आणि लव्ह लाईफमुळे कायम चर्चेत राहिली आहे. तिनं लग्नाआधी केलेल्या बोल्ड वक्तव्यामुळे दीपिका समाजमाध्यमांमध्ये ट्रोल झाली होती.

दीपीका पदूकोण. बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री. अभिनेत्रीनं अभिनयाच्या जादूनं आतापर्यंत तिनं सर्वांना भूरळ घातली आहे. लग्नाआधी तिचं लव्ह लाईफ चर्चेत होतं. कधी तिचे नाव युवराज सिंगशी जोडले होते. तर, कधी एमएस धोनीशी जोडले होते. रणबीर कपूरसोबतची तिची प्रेमकहाणी सर्वश्रूत आहे.

Deepika Padukones Statement
गर्लफ्रेंडचे अश्लील व्हिडिओ, धमक्या अन् बलात्कार; कल्याणच्या राजकीय पक्षातील तरूणानं प्रेयसीला छळलं

रणबीर कपूर आणि दीपीका पदूकोण रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंही केलं होतं. त्यांचं रिलेशनशिप लग्नापर्यंत पोहोचलं होतं. मात्र, नंतर दोघांचं ब्रेकअप झालं. असे म्हटले जाते की, दीपीका पदूकोण ब्रेकअप खूप निराश झाली होती.

नंतर दीपीका पदूकोणच्या आयु्ष्यात रणवीर सिंह आला. दीपिकानं आतापर्यंत त्याच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दोघांनी २०१८ साली इटलीमध्ये मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलं. नंतर दोघांना मुलगी झाली. जिचं नाव दुआ आहे. दीपिका कायम आपल्या विधानामुळे चर्चेत राहिली आहे. २०१५ साली तिचं एक विधान प्रचंड चर्चेत आलं होतं.

Deepika Padukones Statement
शिवसेना ठाकरे गटाची दिवाळी जोरात; इनकमिंग सुरूच, बड्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन

२०१५ साली वोग मासिकेच्या एका व्हिडिओमध्ये तिनं विधान केलं होतं. या मॅगझिनचं टायटल 'माय चॉइस', असं होतं. महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या या मोहिमेत दीपीका पदूकोण आणि इतर अनेक महिलांचा यात समावेश होता. अभिनेत्रीनं तेव्हा सांगितले की, 'कुणासोबत झोपायचं की नाही, हे वैयक्तिक प्रत्येकीचा निर्णय आहे', असं दीपिका म्हणाली होती.

Deepika Padukones Statement
वर्गातच शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य, चौथीतील मुलीसोबत नेमकं काय घडलं? पुणे हादरलं

दीपीका पदूकोण म्हणाली, 'मला माझे आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगायचे आहे. मला माझ्या आवडीप्रमाणे कपडे घालायचे आहेत. पुरूष असो किंवा स्त्री.. माझ्या इच्छेनुसार मी कुणावरही प्रेम करेन', असंही मुलाखतीदरम्यान दीपिका म्हणाली होती. 'लग्नापूर्वी मी कुणासोबत मी सेक्स करावा, लग्नानंतर मी सेक्स करावा की नाही.. हे सर्वस्व माझ्यावर अवलंबून आहे', असंही दीपिका म्हणाली होती.

दीपिका पदुकोणनं केलेल्या विधानामुळे बराच वाद निर्माण झाला होता. काहींनी अभिनेत्रीच्या वक्तव्याचे समर्थन केले. तर, काहींनी टीका केली होती. एका वृत्तवाहिनीला टीकेला उत्तर देताना दीपिकाने म्हणाली, 'माझा हेतू कुणालाही दुखावण्याचा नव्हता. मी लग्न आणि रिलेशनशिपवर विश्वास ठेवते. त्यांना पवित्र मानते', असं दीपिका म्हणाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com