गर्लफ्रेंडचे अश्लील व्हिडिओ, धमक्या अन् बलात्कार; कल्याणच्या राजकीय पक्षातील तरूणानं प्रेयसीला छळलं

Shocking Incident in Kalyan: कल्याणमध्ये एका 29 वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Shocking Incident in Kalyan
Shocking Incident in KalyanSaam Tv
Published On
Summary
  • कल्याणमधील धक्कादायक प्रकार.

  • लग्नाचं आमिष दाखवून २९ वर्षीय तरुणीवर बलात्कार.

  • मोबाईल हॅक करून धमक्या.

  • अश्लील व्हिडिओंचा वापर करून केला प्रियकरानेच अत्याचार.

संघर्ष गांगुर्डे, साम टिव्ही

कल्याणमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. लग्नाचं आमिष दाखवून २९ वर्षीय तरूणीवर बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. आरोपी हा प्रियकर असून, त्यानं प्रेयसीचा मोबाईल हॅक करून तिच्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचे काही अश्लील व्हिडिओ तयार केले. या व्हिडिओद्वारे आरोपीनं तरूणीला ब्लॅकमेल केलं. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

कल्याण पश्चिममध्ये हा सर्व प्रकार घडला. २९ वर्षीय तरूणीचे राजकीय पक्षाशी संबंधित तरूणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही काळानंतर दोघांमध्ये खटके उडाले होते. दोघांमध्ये मतभेद सुरू होते. प्रेयसीवर प्रियकर कायम संशय घेत होता. आरोपी तरूणानं प्रेयसीवर बलात्कार केला. नंतर तिच्या वैयक्तिक आयुष्यात लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला.

Shocking Incident in Kalyan
नवऱ्यासोबत पुजेला बसली, हवन कुंडात तूप टाकलं अन् ओढणीनं पेट घेतला, महिलेचा होरपळून मृत्यू

आरोपी तरूणानं प्रेयसीचा मोबाईल हॅक केला. तसेच तिच्यावर पाळत ठेवली. यासह तिचे अश्लील व्हिडिओ बनवले. एवढंच नाही तर तरुणीच्या कुटुंबीयांनाही धमक्या देत ब्लॅकमेल केलं. अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. पोलीस तपासात आरोपी तरूणाच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ सापडले.

Shocking Incident in Kalyan
सरपंचाच्या मुलाचा प्रताप! तरुणाला अमानुष मारहाण करत तोंडावर लघवी केली; आईलाही सोडलं नाही...

तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. विनीत गायकर असे आरोपी प्रियकराचे नाव असून, कल्याण खडकपाडा पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती आहे. पोलिसांवर दबाव असून तो अजूनही फरार आहे. पोलिसांचा शोध सुरू आहे.

Shocking Incident in Kalyan
शिवसेना ठाकरे गटाची दिवाळी जोरात; इनकमिंग सुरूच, बड्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com