नवऱ्यासोबत पुजेला बसली, हवन कुंडात तूप टाकलं अन् ओढणीनं पेट घेतला, महिलेचा होरपळून मृत्यू

Fire During Havan Claims Life of Woman in Dombivli: हवन करताना अग्नीत तूप टाकताना महिलेच्या डोक्यावरील स्कार्फने पेट घेतला. महिलेचा आगीत होरपळली. रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू.
Fire During Havan Claims Life of Woman in Dombivli
Fire During Havan Claims Life of Woman in DombivliSaam
Published On
Summary
  • डोंबिवलीतून धक्कादायक बातमी समोर.

  • नवरात्रोत्सवाच्या अष्टमीला धार्मिक पूजेदरम्यान अपघात.

  • महिलेचा आगीत होरपळून मृत्यू.

संघर्ष गांगुर्डे, साम टिव्ही

डोंबिवली पूर्वेकडील टिळकनगर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नवरात्रोत्सवाच्या अष्टमीच्या दिवशी एका तरूणीचा अपघात झाला होता. होम कुंडात तुपाची आहुती देत असताना तरूणीच्या स्कार्फने पेट घेतला. यामुळे तरूणी गंभीर भाजली होती. तिला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, २ आठवडे उपचार घेतल्यानंतर तिचा दुर्देवी मृत्यू झाला.

सरिता निरंजन ढाका (वय वर्ष ३३) असे मृत तरूणीचं नाव आहे. तरूणी पती निरंजन इंदरलाल ढाका (३६) यांच्यासह टिळकनगरमधील शिव पॅराडाईज इमारतीत राहत होती. या मृत्यूप्रकरणी सरिता यांच्या पतीने दिलेल्या माहितीवरून टिळकनगर पोलिसांनी अकस्मित मृत्युची नोंद केली आहे.

Fire During Havan Claims Life of Woman in Dombivli
शिवसेना ठाकरे गटाची दिवाळी जोरात; इनकमिंग सुरूच, बड्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन

निरंजन आणि सरिता ढाका नवरात्रौत्सवानिमित्त पुजेला गेल्या होत्या. अष्टमीनिमित्त देवीला होम हवन पूजेसाठी सरिता ढाका बसल्या होत्या. सरिता ढाका यांनी गळ्यातील ओढणी डोक्यावर घेतली होती. त्यांची पूजा सुरू होती. इतक्यात तूपाच्या धारेमुळे आगीचा मोठा भडका झाला. ज्वाला मोठी झाली, डोक्यावरील ओढणीनं पेट घेतला.

Fire During Havan Claims Life of Woman in Dombivli
दिवाळीसाठी शॉपिंग करून घराकडे येताना भयंकर अपघात, बायकोच्या डोळ्यासमोर नवऱ्याने सोडले प्राण

इतरांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरिताचे शरीर भाजले होते. त्यांना तात्काळ डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील एम्स रूग्णालयात हलविण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच दोन आठवड्यानंतर सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. व्ही. विसपुते अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com