दिवाळीसाठी शॉपिंग करून घराकडे येताना भयंकर अपघात, बायकोच्या डोळ्यासमोर नवऱ्याने सोडले प्राण

Chhatrapati Sambhajinagar Tragic Road Accident: धामोरी फाट्याजवळ पत्नीसह दिवाळीची खरेदी करून दुचाकीनं परतणाऱ्या दांपत्याच्या दुचाकीला ट्रॅक्टरने भीषण धडक दिली.
Chhatrapati Sambhajinagar Tragic Road Accident
Chhatrapati Sambhajinagar Tragic Road AccidentSaam Tv News
Published On
Summary
  • गंगापूर तालुक्यात दांपत्याच्या दुचाकीला ट्रॅक्टरची भीषण धडक.

  • पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी.

  • त्याच ट्र्रॅक्टरने दुसऱ्या दुचाकीलाही धडक दिली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून एका ह्रदयद्रावक अपघाताची घटना उघडकीस आली आहे. पत्नीसह दिवाळीची खरेदी करून दुचाकीनं माघारी परतणाऱ्या दांपत्याच्या दुचाकीला ट्रॅक्टरने भीषण धडक दिली. या अपघातात पतीचा मृत्यू झाला. तर, पत्नी गंभीर झाली आहे. धडक दिल्यानंतर त्याच ट्रॅक्टरने पुढे जाऊन दुसऱ्या दुचाकीला देखील जोरदार धडक दिली. त्यावरील दोघेही गंभीर जखमी झाले आहे. सध्या त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात घडलीय. अगोदर धामोरी फाट्याजवळ दुचाकीला धडक दिली. त्यानंतर त्याच ट्रॅक्टरने समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. या घटनेमुळे दिवाळीपूर्वीच कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Tragic Road Accident
'युती करू नका, मग तुमची अवस्था काय होते ते बघा..'; भाजप नेत्याचा शिंदे गटाला इशारा

विठ्ठलसिंग नरसिंग जारवाल (वय ४२, वरझडी), असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर रंजना जारवाल असे जखमी महिलेचे नाव आहे. विठ्ठलसिंग जारवाल हे वरझडी येथे कुटुंबासह राहतात. दिवाळी असल्याने खरेदी करण्यासाठी ते लासुर स्टेशन येथे पत्नीसह दुचाकीने गेले होते. दिवाळीची खरेदी करून पती-पत्नी गावाकडे दुचाकीने परतत होते. जरवल यांची दुचाकी धामोरी फाट्याजवळ येताच समोरून भरधाव ट्रॅक्टर आला.

Chhatrapati Sambhajinagar Tragic Road Accident
“ऑल इज वेल!” रेल्वे स्थानकावर महिलेला प्रसुती कळा, व्हिडिओ कॉलवर डॉक्टरची मदत घेऊन 'रँचो'नं केली डिलिव्हरी

ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये विठ्ठल सिंग गारवाल यांचा मृत्यू झाला तर पत्नी रंजना या जखमी झाल्या आहेत. हा अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टरने पुन्हा समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिला आणि पुरुष गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती शिल्लेगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. जारवाल कुटुंबातील कर्ता पुरुष या अपघातात गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईकांनी रुग्णालयात टाहो फोडला होता. संबंधित ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com