Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर दहा राऊंड गोळीबार झाला. अभिनेता सुरक्षित असून, पोलिसांनी तपासासाठी १२ विशेष पथके तैनात केली आहेत. आता जॅकी श्रॉफ यांच्या टीमने टायगरच्या हेल्थची अपडेट दिली आहे.
Tiger Shroff Health Update
Tiger Shroff Health UpdateSaam Tv
Published On: 

Tiger Shroff Firing: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी मुंबईतील जुहू परिसरात हा प्रकार घडला. तीन अज्ञात व्यक्तींनी टायगर श्रॉफच्या कारवर दहा राऊंड गोळ्या झाडल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे बॉलिवूडसह मुंबईत खळबळ उडाली आहे. सुदैवाने, या हल्ल्यात टायगर श्रॉफ सुरक्षित असून त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, त्यासोबत असणाऱ्या चालक आणि एक रिक्षावाला गोळीबारात जखमी झाला. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिसांनी वेगाने सुरू केला आहे.

गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे?

टायगर श्रॉफच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, अभिनेत्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती त्याचे वडील जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली आहे. 'इंडिया टुडे'शी बोलताना टीमने, "टायगर ठीक आहे. तुमचे खूप खूप आभार," अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

Tiger Shroff Health Update
Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

जुहू परिसरात नेमकं काय घडलं?

मुंबईतील जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पुष्पा पार्क परिसरात ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, तीन अज्ञात व्यक्तींनी टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केला. या घटनेत अभिनेत्याचा चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाला. दोघांनाही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबारादरम्यान चालकाला दुखापत झाल्यानंतर टायगर श्रॉफने स्वतः गाडी चालवत घटनास्थळावरून सुरक्षितपणे बाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. पोलीस उपायुक्त मोहित गर्ग यांनीही अभिनेता सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.

Tiger Shroff Health Update
Madhuri Dixit: धकधक गर्लचा जलवा; माधुरी दीक्षितचा निळ्या साडीतील दिलखेचक लूक व्हायरल

हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी १२ विशेष पथके तैनात

गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी १२ विशेष पथके तैनात केली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी हा हल्ला का केला, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी सांताक्रूझ परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, या व्यक्तीचा या घटनेतील सहभाग तपासातून स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com