Madhuri Dixit: धकधक गर्लचा जलवा; माधुरी दीक्षितचा निळ्या साडीतील दिलखेचक लूक व्हायरल

Shruti Vilas Kadam

नारंगी आणि निळ्या रंगाची सुंदर साडी

माधुरी दिक्षितने नारंगी आणि निळ्या रंगाची आकर्षक कॉम्बिनेशन असलेली साडी नेसली आहे. या साडीमध्ये तिचा लूक आणखी उठून दिसत आहे.

Madhuri Dixit

फुलांच्या प्रिंटने वाढवली साडीची शोभा

साडीवर मोठ्या आकारातील रंगीबेरंगी फुलांची डिझाइन्स आहेत. निळ्या, गुलाबी आणि हिरव्या रंगांच्या प्रिंटमुळे साडीला फ्रेश आणि आकर्षक लूक मिळाला आहे.

Madhuri Dixit

निळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाउज

या साडीसोबत माधुरीने निळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केला आहे. साडीच्या रंगांशी जुळणारा हा ब्लाउज तिच्या संपूर्ण लूकला स्टायलिश बनवत आहे.

Madhuri Dixit

चमकदार कानातले

माधुरीने कानात निळ्या आणि सिल्व्हर रंगाचे आकर्षक स्टोनवर्क असलेले इअररिंग्स घातले आहेत. या दागिन्यांमुळे तिच्या लूकला ग्लॅमरस टच मिळाला आहे.

Madhuri Dixit

मोकळ्या केसांची स्टायलिश हेअरस्टाइल

माधुरीने केस मोकळे ठेवले असून त्यांना हलक्या वेव्ह्ज दिल्या आहेत. एका बाजूला घेतलेल्या या केसांच्या स्टाइलमुळे तिचा लूक अधिक एलिगंट दिसत आहे.

Madhuri Dixit

नॅचरल मेकअप आणि गुलाबी लिपस्टिक

माधुरीने चेहऱ्यावर सॉफ्ट मेकअप केला आहे. डोळ्यांना हलका मेकअप, आयलायनर आणि गुलाबी रंगाची लिपस्टिक यामुळे तिच्या लूकला चार चाँद लागले आहे.

Madhuri Dixit

पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइल

रंगीत साडी, स्लीव्हलेस ब्लाउज, स्टायलिश कानातले आणि मोकळे केस यामुळे माधुरीचा लूक आणखी खुलून दिसत आहे. सणसमारंभ किंवा खास कार्यक्रमांसाठी हा लूक रिक्रिएट करता येईल.

Madhuri Dixit

Naukasana Benefits: वाढलेलं वजन कमी करायचंय? फिट शरीरासाठी घरच्या घरी सकाळी करा 'हा' सोपा योगा

Naukasana Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा