Shruti Vilas Kadam
सर्वप्रथम जमिनीवर पाय समोर पसरून बसा. त्यानंतर गुडघे थोडे वाकवून पाय जमिनीपासून वर उचला आणि शरीराचा तोल सांभाळत पाठ किंचित मागे घ्या. हात समोर सरळ ठेवा आणि १० ते १५ सेकंद या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला कमी वेळ सराव करा.
नौकासन करताना पोटाच्या स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे पोटाचे आणि कोअर मसल्स मजबूत होण्यास मदत होते.
नियमित योगा आणि संतुलित आहारासोबत नौकासन केल्यास वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. पण,यासाठी सातत्य महत्वाचे.
नौकासन करताना शरीराचा तोल सांभाळावा लागतो. त्यामुळे शरीराचा समतोल सुधारण्यास मदत होते. याचा रोजच्या आयुष्यात फार फायदा होतो.
नौकासन करताना पोटासोबतच पाठीच्या स्नायूंनाही काम करावे लागते. त्यामुळे शरीराची स्थिरता आणि स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होऊ शकते.
नौकासन नियमित केल्याने शरीराची लवचिकता वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरिर अधिक एनर्जीत काम करायला सुरुवात करतं.
हे आसन करताना शरीराचा तोल आणि श्वासांवर लक्ष केंद्रित करावे लागते. त्यामुळे शरिराची एकाग्रता वाढते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची १००% पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.