Weight Effect on Knees: वाढलेल्या वजनामुळे गुडघ्यांवर काय परिणाम होतो? डॉक्टरांनी सांगितली अशी घ्या काळजी

Shruti Vilas Kadam

वाढलेल्या वजनाचा गुडघ्यांवर पडतो भार

शरीराचे वजन वाढल्यास चालताना, जिने चढताना किंवा खुर्चीतून उठताना गुडघ्यांवर अधिक ताण येऊ शकतो. गुडघे हे शरीराचे वजन पेलणारे महत्त्वाचे सांधे असल्यामुळे वाढलेल्या वजनाचा त्यांच्यावर परिणाम होतो.

knee pain | canva

गुडघ्यांच्या कुर्चेचे होऊ शकते नुकसान

गुडघ्यांच्या सांध्यांमध्ये हाडांच्या टोकांवर कुर्चा असतो. तो हाडांमधील घर्षण कमी करण्यास मदत करतो. वाढलेल्या वजनामुळे सांध्यांमध्ये झीज होण्याचा धोका वाढू शकतो.

knee pain | Google

वाढलेल्या वजनामुळे संधीवाताचा धोका वाढतो

जास्त वजन किंवा लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींमध्ये गुडघ्यांच्या ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे संधीवाताचा धोका वाढतो. मात्र हा त्रास वय, आनुवंशिकता आणि गुडघ्यांना झालेल्या दुखापतींमुळेही होतो.

knee pain | Google

थोडे वजन कमी केल्यानेही होऊ शकतो फायदा

वजन जास्त असल्यास ते हळूहळू कमी केल्याने गुडघ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वेदना कमी होणे, चालण्याची क्षमता वाढते आणि दैनंदिन हालचाली करणे सोपे होऊ शकते.

knee pain | Google

गुडघ्यांसाठी योग्य व्यायाम

गुडघ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी चालणे, सायकल चालवणे, पोहणे उपयोगी ठरू शकतात. नियमित हालचालींमुळे स्नायू मजबूत होतात. सतत, गुडघेदुखी असल्यास व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या.

knee Pain | Saam Tv

आहारात करा बदल

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात भाज्या, फळे, डाळी, कडधान्ये आणि प्रोटिनचा समावेश करा. अतिप्रमाणात साखर, तळलेले पदार्थ आणि अतिरिक्त कॅलरी खाणे कमी करा. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याऐवजी संतुलित आहारावर भर द्या.

knee pain | ai

गुडघेदुखीकडे दुर्लक्ष करू नका

चालताना गुडघे दुखणे, सकाळी आखडल्यासारखे वाटणे अशी लक्षणे सतत दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर निदान आणि योग्य उपचारांमुळे त्रास कमी करु शकतात.

knee pain | pinterest

Skin Care: नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी करा 'हा' घरगुती उपाय; स्किन दिसेल क्लिन आणि ग्लोईंग

Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा