Skin Care: नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी करा 'हा' घरगुती उपाय; स्किन दिसेल क्लिन आणि ग्लोईंग

Shruti Vilas Kadam

ब्लॅकहेड्स नेमके कशामुळे होतात?

त्वचेतील छिद्रांमध्ये तेल आणि मृत पेशी जमा झाल्यावर ब्लॅकहेड्स तयार होतात. हे ब्लॅकहेड्स नाक, कपाळ आणि हनुवटीवर होतात.

Skin Care | Saam Tv

चेहरा स्वच्छ ठेवा

ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी दिवसातून दोन वेळा फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल, घाम आणि धूळ काढण्यासाठी ही सवय महत्वाची आहे.

Skin Care

सीताफळाच्या गराचा घरगुती स्क्रब

सीताफळाचा गर, काही थेंब लिंबाचा रस आणि दूधाची मलाई वापरून स्क्रब तयार करा. या हा स्क्रब ब्लॅकहेड्सवर पाच मिनिट लावा आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

Skin Care

चेहऱ्यावर जोरात स्क्रब करू नका

ब्लॅकहेड्स काढण्यासाठी चेहरा वारंवार किंवा जोरात घासल्याने त्वचेवर लालसरपणा, जळजळ आणि सूज येऊ शकते. त्यामुळे साध्या क्लिन्झरचा हलक्या हातांना वापर करा.

Skin Care

सॅलिसिलिक ॲसिड

सॅलिसिलिक ॲसिड असलेली सीरम चेहऱ्यावर लावल्याने त्वचेतील तेल आणि मृत पेशी कमी होते. संवेदनशील त्वचा असल्यास हे सीरम वापरण्याआधी हातावर टेस्ट करुन पाहा.

Skin Care

ब्लॅकहेड्स हाताने दाबून काढू नका

नाकावरील ब्लॅकहेड्स नखांनी दाबून काढू नका. यामुळे त्वचेवर जखम किंवा चेहरा लाल होऊ शकतो. ब्लॅकहेड्स जास्त असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Skin Care

स्किनकेअरची सवय लावा

ब्लॅकहेड्स पुन्हा तयार होऊ नयेत यासाठी नियमितपणे चेहरा स्वच्छ करा, त्वचेला परफेक्ट असे मॉइश्चरायझर वापरा आणि दिवसा सनस्क्रीन लावा. नियमित काळजी घेतल्याने ब्लॅकहेड्स कमी होऊ शकतात.

(टिप : अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या साम टिव्ही याचे १००% समर्थन करत नाही)

Skin Care | Saam Tv

Hair Care: केसांना तेल लावण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी की संध्याकाळी, जाणून घ्या

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा